Homemade Tomato Face Scrubs
Homemade Tomato Face Scrubs esakal

Tomato for Skin : मऊ आणि चमकदार त्वचा हवी आहे ? मग, टोमॅटोपासून बनवा ‘हे’ होममेड स्क्रब्स

Homemade scrubs: आरोग्यासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील टोमॅटो फायदेशीर आहे.
Published on

Homemade Tomato Face Scrubs : टोमॅटोमुळे खाद्यपदार्थांना छान चव येते. टोमॅटो नसेल तर आपले स्वयंपाकघर देखील अधुरे वाटते. एवढा आपल्या आयुष्यात टोमॅटो महत्वाचा झाला आहे. टोमॅटोमध्ये पोषणतत्वांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे, आरोग्यासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील टोमॅटो फायदेशीर आहे.

टोमॅटोचे सेवन करणे, टोमॅटोचा वापर करून बनवलेले स्क्रब आणि फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे. त्वचेतील टॅनिंग, मृत त्वचा काढून टाकण्याचे काम टोमॅटो करतो, यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सॉफ्ट बनण्यास मदत मिळते. आज आपण टोमॅटोपासून बनवल्या जाणाऱ्या फेस स्क्रब्सबद्दल जाणून घेणार आहोत.

टोमॅटो फेस स्क्रब्स खालीलप्रमाणे

टोमॅटो आणि कोरफड फेस स्क्रब

कोरफड आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या फेस स्क्रबसाठी २ चमचे टोमॅटोचा रस घ्या. त्यामध्ये कोरफड जेल एकत्र करा, आता तुमचे फेस स्क्रब तयार आहे. या स्क्रबने चेहऱ्यावर १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांसाठी चेहरा तसाच ठेवा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

टोमॅटो आणि मध फेस स्क्रब

मधामुळे आपल्या त्वचेला छान ग्लो येतो. हे फेस स्क्रब बनवण्यासाठी एक पिकलेले टोमॅटो घ्या. आता त्यामध्ये ३ चमचे दही, १ चमचा मध आणि २ चमचे कोको पावडर घ्या. आता हे सर्व मिश्रण एकत्र करा, तुमचे स्क्रब तयार आहे. या स्क्रबने चेहऱ्यावर १५ मिनिटे मसाज करा, नंतर चेहरा धुवून टाका.

Homemade Tomato Face Scrubs
Green Tea for Glowing Skin : चेहऱ्यावर चमक हवी आहे ? ग्रीन टी आहे मदतीला! बनवा ‘हे’ फेस पॅक

टोमॅटो आणि दालचिनी फेस स्क्रब

दालचिनी आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. या फेस स्क्रबसाठी ४ चमचे टोमॅटोचा रस घ्या. त्यामध्ये, १ चमचा साखर, नारळाचे तेल आणि दालचिनी पावडर त्यात मिक्स करा. या सगळ्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर १० मिनिटे स्क्रबिंग करा. २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

टोमॅटो आणि ग्रीन टी फेस स्क्रब

ग्रीन टी हा आपल्या त्वचेसाठी लाभदायी आहे. हे फेस स्क्रब बनवण्यासाठी एक पिकलेले टोमॅटो घ्या. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा, १ ग्रीन टी बॅग आणि जोजोबा ऑईलचे २-३ थेंब मिक्स करा. आता, या सगळ्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर १५ मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका.

Homemade Tomato Face Scrubs
Glowing Skin : ग्लोईंग स्किन हवी आहे ? ‘या’ फळांचा ब्युटी रूटीनमध्ये करा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()