त्वचेला उजळविणारी ही काही खास उटणी! एकदा ट्राय कराच...

utne
utneesakal
Updated on

त्वचेचे सौंदर्य (skin care) कसे साधावे याचे रहस्य अनेकींना माहीत नसतं. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसावी, यासाठी शरीराला तसंच त्वचेला 'व्हिटॅमिन सी'(vitamin c) चा पुरवठा होणे आवश्यक आहे. तुम्ही जेवढा नैसर्गिक पध्दतीचा (natural remedies) वापर कराल तेवढा तुमच्या त्वचेवर नॅचरल ग्लो (natural glow) दिसेल. चेहऱ्यावर सुरकुत्यांची समस्या निर्माण होत नाही. नितळ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही उटण्यांचा घरगुती उपाय म्हणून देखील वापर करू शकता.(homemade ubtan for glowing skin)

रंग उजळवणारी उटणे

२ चमचे साय, १ चमचा बेसनपीठ व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. १०-१५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. रंग उजळू लागेल.

१ चमचा उडदाची डाळ कच्च्या दूधात भिजवा. मग वाटून पेस्ट तयार करा. यात थोडे गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. थोडावेळ वाळू द्या. मग हळूहळू गोलाकार फिरवत फिरवत उटणे काढावे व चेहरा धुवावा. त्वचा चमकदार होईल.

२ चमचे बेसनपीठ, १ चमचा मोहरीचे तेल व थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. पूर्ण शरीरावर हे उटणे लावावे. काही वेळाने हळूहळू रगडून काढून टाकावे व अंघोळ करावी. त्वचा मऊ मुलायम होईल.

कोरड्या त्वचेसाठी

१ मोठा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा मध व १ छोटा चमचा अंड्याचा पांढरा भाग मिसळून लेप तयार करा. ५ मिनिटे लावून चेहरा धुवून घ्या.

मोठा चमचा चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून लेप तयार करा. मग चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवून हलक्या हाताने चोळून काढावे. चेहरा स्वच्छ धुवावा.

पिकलेलं केळ कुस्करून घ्या. त्यात थोडं मध व लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. ५-६ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा तर उजळतोच व सुरकुत्याही नष्ट होतात.

तेलकट त्वचेसाठी

१ मोठा चमचा जवाचे पीठ, १ मोठा चमचा सफरचंदाचा गर मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.

२ मोठे चमचे संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये थोडे कच्चे दूध आणि गुलाबपाणी घालून घट्ट लेप तयार करा. चेहऱ्यावर लावून थोड्या वेळाने चेहरा धुवून घ्या. त्वचा सतेज होईल.

१ मोठा चमचा दही व १ छोटा चमचा काकडीचा रस मिसळून १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.