गृहिणी नव्हे होममेकर‌‍! असं बना मल्टी-टास्कर

गृहिणी पदासोबतच एका स्त्रिला अनेक नाते, आई, पत्नी,सून, मुलगी, वहिनी, नणंद या नात्यांसह आलेली जबाबदारी सांभाळावी लागते.
House Wife
House WifeSakal
Updated on

एखादी उच्‍चशिक्षित महिला नोकरी न करता केवळ घरच सांभाळत असेल तर. मग उपयोग काय शिक्षणाचा? असाही प्रश्‍न उपस्थित होतो. पण घर संसार सांभाळणे, हेसुद्धा एक कौशल्य आहे. म्हणूनच गृहिणी असलेल्या उच्चशिक्षित महिला अभिमानाने आम्ही ''होममेकर'' असल्याचे सागतात. शहरातील विविध भागातील या महिलांशी संवाद साधला असता त्यातून त्यांचा हा खंबीरपणा व्यक्त झाला.

गृहिणी पदासोबतच एका स्त्रिला अनेक नाते, आई, पत्नी,सून, मुलगी, वहिनी, नणंद या नात्यांसह आलेली जबाबदारी सांभाळावी लागते. भावी पिढी घडविण्याची मुख्य जबाबदारी, कुटुंबाचे आर्थिक नियोजन, दररोज वापराच्या वस्तूंची उपलब्धता तपासणे, मुलांच्या शिक्षणाशी संबधित नियोजन, परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे हे करते तरीही काहीच करीत नसल्याचा ठपका त्यांच्यावर बसतो. वारंवार त्यांची हेटाळणी करून तुच्छ लेखले जाते. ''तुला काही कळत नाही, घरची कामे कर आणि गप्प बैस'' असेच त्यांना बजावले जाते. (Homemaker, not housewife! Become a multi-tasker)

House Wife
Heatstroke: उन्हाळ्यात रहा ठंडा ठंडा कूल कूल! उष्माघातापासून होईल संरक्षण

दिवसभर घरी राहून करतेस काय ? असा खोचक सवाल तिला घरातील सदस्य व मुलं करतात. प्रत्येकाला त्याची स्पेस हवी असते व ती मिळतेही. पण गृहिणींना त्यांची स्पेस किंवा त्यांचे छंद जोपासण्यास किती वेळ मिळतो. याचे उत्तर कुणाकडेच नाही.

मल्टी-टास्कर गृहिणी-

एकाचवेळी अनेक प्रकारची कामे आणि जबाबदारी सांभाळण्याचे कौशल्य गृहिणींकडे असते. मुलांचे संगोपन, कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी, प्रत्येकाच्या ब्रेकफास्ट, लंच, डीनरच्या वेळा सांभाळणे. घराची स्वच्छता, अनेक कार्यक्रमांचे नियोजन, घरातील महत्तवपूर्ण आर्थिक व्यवहार सांभाळणे.

गृहिणींची वैशिष्टये-

  • मैत्रीण

  • व्यवस्थापक

  • हितचिंतक

  • आहारतज्ज्ञ

  • सल्लागार

House Wife
Parenting Tips: तुमची मुलं पुरेशी झोप घेत नाहीत? होऊ शकतं 'हे' नुकसान

गृहिणींसमोरील आव्हाने-

सेवाभाव, स्वीकार, शेजारधर्म, कृतज्ञता, संयम, काटकसर, सहानुभुती, नात्यातील महत्व.मुळात घरात काम करणाऱ्या महिलेला गृहिणी म्हणतात हे चुकीचे आहे. दिवसभर सर्व कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारी महिला होममेकरच असते. परंतु तो दर्जा दिला जात नाही. आपला स्वाभिमान कसा मिळवायचा ते स्त्रियांनी ठरवावे. तुम्ही होममेकरच आहात हे समजून घ्यावे.

- वंदना वनकर, अध्यक्ष, सत्यशोधक महिला महासंघ, महाराष्ट्र प्रदेश.

मी कला शाखेत पदवी पूर्ण केली असून, एक गृहिणी आहे. परंतु गृहिणी म्हणून माझ्याकडे असलेल्या जबाबदाऱ्या इतर नोकरी करणाऱ्या महिलांपेक्षा कमी नाहीत. गृहिणींना कमी दर्जाचे समजणे ही समाजाची चूक आहे. होममेकर म्हणून संबोधने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

- वर्षा खुबाळकर, गृहिणी

गृहिणीच्या कामाची दखल घेतली जात नाही. मी विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. लग्नानंतर काही दिवस व्यवसाय केला. आता गृहिणी आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपल्या घरून सुरुवात करायला हवी. गृहिणींना इतर नोकरी करणाऱ्या स्त्रियांप्रमाणे सन्मान मिळावा.

- सोनाली शेंडे, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.