Hormonal Imbalalnce: हार्मोन्स असंतुलितची समस्या जाणवतेय? मग, महिलांनो आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवायची असेल योग्य आहार घेणे महत्वाचे आहे.
Hormonal Imbalalnce
Hormonal Imbalalnceesakal
Updated on

Hormonal Imbalalnce : आजकाल महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन होण्याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येमुळे महिलांना मासिक पाळी वेळेवर न येणे, सतत मूड स्विंग्स होणे, चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येणे, अनावश्यक केस येणे इत्यादी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या समस्या कमी करण्यासाठी अनेकदा उपचारांवर भर दिला जातो. हा भर दिलाच पाहिजे मात्र, त्यासोबतच महिलांनी त्यांच्या आहारावर ही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी संतुलित आहार देखील तितकाच फायदेशीर आहे.

या परिस्थितीमध्ये जर शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवायची असेल तर आजपासून आहारात काही गोष्टींचा समावेश करा. ज्यामुळे, शरीरातील हार्मोनल बॅलन्स हा संतुलित राहण्यास मदत होईल. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात

Hormonal Imbalalnce
Health Care : पपई खाल्ल्यानंतर 'या' पदार्थांचे करू नका सेवन, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे की, मेथी, पालक, कोथिंबीर, चाकवत इत्यादी हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर आढळून येते. या भाज्यांमध्ये मॅग्नेशिअमसारख्या घटकांचे विपुल प्रमाण आढळून येते.

जे आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे, या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जरूर समावेश करा.

हळद

हळद हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात बेस्ट आणि आरोग्यदायी घटक आहे. हळदीमध्ये दाहकविरोधी गुणधर्म आढळून येतात, जे आपल्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात.

स्वयंपाकघरापासून ते आरोग्यापर्यंत अशा सर्वच पातळ्यांवर हळद अतिशय फायदेशीर आणि औषधी घटक आहे.

दही

दह्यामध्ये प्रोटिन, कॅल्शिअम, रायबोफ्लोविन, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B 12 चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी दही फायदेशीर आहे. त्यामुळे, अनेकांच्या आहारात दह्याचा समावेश आढळून येतो.

ताज्या दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रो-बायोटिक्स आढळते आणि त्यात हेल्दी फॅट्स देखील आढळून येतात. त्यामुळे, दह्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील हार्मोन्सची पातळी बॅलन्स राहण्यास मदत होते.

Hormonal Imbalalnce
Benefits of Zumba : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे झुम्बा, जाणून घ्या ‘हे’ फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.