Horseshoe Ring Benefits : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे आणि त्यानुसार ग्रहांचा माणसाच्या जीवनावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो. ग्रहांची चांगली स्थिती तुमच्या जीवनात आनंद आणते. दुसरीकडे ग्रहांची स्थिती खराब असेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. लोक काम करतात तरी त्यांना म्हणावा असा फायदा होत नाही. त्यांच्या मागे लागलेले ग्रह दोष दूर करावे लागतात. त्यावर एक जालीम उपाय म्हणून घोड्याच्या नालेकडे पाहिले जाते.
घोड्याची घासलेली नाल विशेष करून काळ्या घोड्याची नाल फक्त अंगठी बनवून अनेक जण घालतात असं नाही. तर प्राचीन काळापासून याचा वापर आपल्या घराच्या दरवाज्यावरही लावून केला जातो. घोड्याच्या घासलेल्या नालेत असं काय असतं? की लोकं आपल्या घरावर ती लावतात.
तर शनीच्या उद्रेकापासून बचाव करण्यासाठी घोड्याच्या नालेची हातात अंगठी करून पण नाल घालतात. वास्तूच्या हिशोबानं घोड्याची नाल दूर्भाग्य हरणारी आहे. विशेष करून काळ्या घोड्याची नाल नकारात्मक शक्ती खेचून घेणारी आहे.
कारण ही नाल लोखंडाची असते म्हणून ती शनीच्या वाईट प्रभावापासून बचाव करते. शनीचा आवडता रंग काळा आहे म्हणून काळ्या घोड्याची नाल शोधली जात असते. घोड्याची नाल असली तर दृष्ट विरोधी मानली जाते, असं म्हणतात. म्हणजे जर कुणाला दृष्ट लागली तर घोड्याची नाल शत्रूंपासून रक्षणही करतात.
व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचा विशेष प्रभाव पडतो आणि ग्रहांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात. ज्यामध्ये घोड्याच्या बुटाने बनवलेल्या अंगठीचाही समावेश आहे.
अशा परिस्थितीत ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे खूप फायदेशीर ठरतात. ज्योतिष शास्त्रानुसार घोड्याची नाल आणि त्यापासून बनवलेली अंगठी तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचवू शकते.
जर एखाद्या व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्याने आपल्या हातात घोड्याच्या बुटाची अंगठी घालावी. चला जाणून घेऊया घोड्याच्या नालची अंगठी कोणत्या बोटात घातली पाहिजे आणि त्याचे फायदे.
या बोटात अंगठी घाला
ज्योतिष शास्त्रानुसार घोड्याच्या नाळेची अंगठी नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात म्हणजेच फक्त मधल्या बोटात घातली पाहिजे. कारण या बोटात शनीचा वास असल्याचे मानले जाते. जर तुम्ही या बोटात घोड्याच्या नालची अंगठी घातली तर तुमच्या आयुष्यात धन-संपत्ती आणि सुख-समृद्धी कायम राहते.
घोड्याची नाल घरात लावण्याचे उपाय
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला प्रिय लोखंड मानलं जातं. ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे त्यांनी काळ्या घोड्याची घासलेली नाल घ्यावी त्याची अंगठी घालावी, असा सल्ला दिला जातो. यानं शनीचा वाईट प्रभाव संपून जातो.
जर आपल्या घरात प्रगती होत नसेल तर आपण घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावावी, सोबतच एका काळ्या कपड्यामध्ये बांधून जिथं धान्य ठेवतात तिथं ठेवावं. प्रगती मग कमी होत नाही.
धन येत नसेल किंवा घरात आलेलं धन टिकत नाही तर आपण काळ्या घोड्याची नाल लावावी. सोबतच ज्यांच्यावर नोकरीचं संकट येतं, त्यांनी आपल्या घराच्या तिजोरीत काळ्या कपड्यांमध्ये घालून काळ्या घोड्याची नाल ठेवावी.
वास्तुशास्त्रानुसार ज्या घोड्याची नाल धावता-धावता खाली पडते ती खूप चांगली मानली जाते. अशी नाल जर मिळाली तर आपल्या इतकं नशीबवान कुणी नसेल. दुर्भाग्यापासून आपलं रक्षण ही नाल करते.
दुकानाबाहेर काळ्या घोड्याची नाल ठोकून ठेवल्यानं व्यवासायात प्रगती होते आणि लोकांची दृष्टही लागत नाही.
घोड्याची नाल लावल्यानं आपलं घर सुरक्षित राहतं. मात्र त्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.