Hot Food in Fridge : आपण अनेकदा फ्रिज मध्ये नक्की कोणते पदार्थ ठेवावे कधी ठेवावे याबाबत संभ्रमात असतो; असाच एक संभ्रम म्हणजे, गरम अन्न फ्रिजमध्ये का ठेवायचं नाही? रेफ्रिजरेटरच्या मॅन्युअलमध्ये स्पष्ट लिहिलं असत की फ्जमध्ये कधीही गरम अन्न ठेवू नका कारण यामुळे फ्रीज खराब होऊ शकतो.
फ्रीजमध्ये अन्न साठवताना काळजी घ्या
शिजवलेले अन्न जास्त वेळ ताज रहावं; ते नासायला नको म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. पण अस करताना आपण रेफ्रिजरेटरसोबत असलेल्या मॅन्युअलमध्ये लिहिलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.
फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवल्यास ते खराब होऊ शकत, असे मॅन्युअलमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. जर तुम्ही अन्न शिजवल्याबरोबर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर त्याने तुमच्या रेफ्रिजरेटरचे नुकसान होतेच पण ते अन्न सुद्धा नासू शकते.
या कारणांमुळे गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवू नका
फ्रिजमध्ये गरम वस्तू ठेवताच फ्रीजचे वातावरण तापू लागते. मग कंप्रेसरला टेम्प्रेचर मेन्टेन करता येत नाही. यामुळे काही दिवसात ते खराब होऊ शकते.
थर्मोडायनामिक्सच्या दुसऱ्या नियमानुसार, उबदार हवा जास्त तापमानाच्या ठिकाणाहून कमी तापमानाच्या ठिकाणी जाते. रेफ्रिजरेटरमध्ये गरम अन्न किंवा दूध इत्यादी ठेवताच भांड्यांचे तापमान आणि रेफ्रिजरेटरचे तापमान यांच्यातील तफावतामुळे कंडेन्सेशनची प्रक्रिया होते, त्यामुळे भांड्यावर पाण्याचे थेंब गोठू लागतात. हे थेंब फ्रीजच्या आतही गोठू लागतात ज्यामुळे आर्द्रता वाढते. फ्रीजमधील ओलाव्यामुळे अन्न खराब होऊ शकते आणि त्यात विषबाधा देखील होऊ शकते.
आपण घाईत असल्यास काय करावे?
अनेकदा घाई असते; मग अशावेळेस तुम्ही अन्न शिजल्यानंतर, रूम टेम्प्रेचरला थंड होऊ द्या आणि मगच ते फ्रीजमध्ये ठेवा. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अन्न शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत खा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. जर एवढा वेळ आपल्या कडे नसेल तर सरळ अन्न ज्या भांड्यात आहेत त्या भांड्याच बुड बुडेल इतक्या पाण्यात ते जरा वेळ ठेवून द्या. अवघ्या दहा मिनिटात अन्न रूम टेम्प्रेचरला येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.