Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Warm Water Bad For Health : वाळ्यात, बहुतेक लोक गरम पाण्याचे सेवन करतात. पण गरम पाणी प्यायल्याने काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.
Hot Water side effects
Hot Water side effects esakal
Updated on

Hot Water Side Effects :

आरोग्यासाठी चांगलं असतं, वजन कमी होतं, पित्त, जळजळ कमी होते म्हणून अनेक लोक सकाळी उठल्यावर कोमट पाणी पितात. वजन कमी करणाऱ्या लोकांच्या तर हा जीवनाचा भाग बनला आहे. गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलं असतं. मात्र, काही लोकांनी गरम पाण्यापासून दूर राहण्यातच शहाणपणा असतो.

Hot Water side effects
Hot Water Side Effects : वजन कमी करण्यासाठी कोणाचंही ऐकून गरम पाणी पिऊ नका? आधी हे वाचा!

गरम पाण्यात चयापचय सुधारण्याची, पचनशक्ती वाढवण्याची, अस्वस्थता कमी करण्याची आणि विश्रांती देण्याची क्षमता असते. हे फायदे मिळविण्यासाठी, विशेषतः हिवाळ्यात, बहुतेक लोक गरम पाण्याचे सेवन करतात. पण गरम पाणी प्यायल्याने काही आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

गरम पाणी पिण्याचे हानिकारक परिणाम (Warm Water Drinking Side Effects)

सर्दी-खोकला असलेल्यांनी गरम पाणी पिऊ नये 

हिवाळ्यात थंडी पडू लागते तर दुपारच्यावेळी कडक उन असतं. अशावेळी आपल्याला साथीचे आजार होतात. सर्दी आणि खोकला मोठ्या प्रमाणावर होतो. सर्दी खोकला झाल्यास गरम पाणी पिणे टाळावे. यामुळे घशात सूज आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे तब्येत बिघडू शकते. या काळात कोमट पाणी प्यावे.

Hot Water side effects
Hot Water : दिवाळी Fats घालवण्यासाठी गरम पाण्यासोबत 'हे' घ्या

लहान मुलांना नका देऊ गरम पाणी

लहान मुलांच्या आरोग्यावर ऋतूबदलाचा थेट परिणाम होतो. त्यामुळे मुलं आजारी पडतात. अशातच तुम्ही मुलांना गरम पाणी देऊ नका. लहान मुलांनी गरम पाणी पिऊ नये. कारण मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक असते ज्यामुळे त्यांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो.

Hot Water side effects
वातानुकूलित लोकलमध्ये गरमागरम प्रवास

यकृताच्या रुग्णांनी गरम पाणी पिऊ नये

इतर शारीरिक व्याधींमध्ये यकृताचा आजार असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, त्यांना खाण्या-पिण्याच्या पदार्थात बदल झाला तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे यकृताच्या रूग्णांनीही गरम पाणी पिऊ नये. त्यामुळे यकृतावर अतिरिक्त दबाव पडतो. त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.

Hot Water side effects
Hot Milk Benefits : दूध उकळणे गरजेचे का आहे? फायदे वाचून तुम्हीही वाल चकीत

दातांच्या समस्या असलेल्यांनी गरम पाणी पिऊ नये

काहीवेळा खाण्याच्या चुकीच्या सवयी, दातांची योग्य काळजी न घेतल्याने तुमचे दात संवेदनशील होतात. त्यांना अती थंड, अती गरम पदार्थ, पाणी सहन होत नाही. तेव्हा दातांतून तिव्र वेदना होऊ शकतात. त्यामुळे, आपण फक्त सामान्य पाणी प्यावे. त्यामुळे आतापासून या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमचे आरोग्य बिघडण्यापासून वाचवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()