उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि रोग तसेच हंगामी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे
Immune System
Immune Systemsakal
Updated on

विविध आजार आणि कोरोनाच्या वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे आरोग्याला धोका वाढलाय. यामुळेच सरकारने सर्व वयोगटातील लोकांसाठी बूस्टर डोस मंजूर केलाय. ओमिक्रॉनच्या नवीन स्ट्रेन XE मध्ये वेगाने संक्रमित करण्याची क्षमता आहे तर त्याची लक्षणे सौम्य असल्याचे सांगितले जाते परंतु अद्याप याबद्दल जास्त माहिती नाही. अशात आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि रोग, तसेच हंगामी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत बदल करणे महत्वाचे आहे. ज्यामध्ये संतुलित आहारापासून ते व्यायाम आणि योग्य झोप घेणेही आवश्यक आहे. (here’s a lot you can do to optimize your immune system’s performance.)

Immune System
Saree: नागपुरी साडीचे ‘जीआय’ मानांकन अडकले लालफितशाहीत

आपली रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीराची संरक्षण यंत्रणा आहे आणि जी कोणत्याही विषाणूंविरोधात आपली रोगप्रतिकारक लढण्याचा प्रयत्न करते.मात्र उष्णतेमुळे थकवा, अशक्तपणा, डिहायड्रेशन, अपचन यांसारख्या समस्या सुरू होतात, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ शकते.

उन्हाळ्यात जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात, उष्णतेपासून बचाव करतात आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवू शकतात अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया. ((How can we make our immunity strong against corona xe variant in summer))

Immune System
तृतीयपंथी सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त काळ जगतात; जाणून घ्या रहस्य

हायड्रेशन

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे जेणेकरुन सर्व अवयव त्यांचे कार्य व्यवस्थित करू शकतील. यासोबतच शरीर संसर्ग आजारांपासून दूर राहून हायड्रेटेड राहते.

प्रोबायोटिक

दही, सोअरक्रॉत, ताक इत्यादी गोष्टी शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

Immune System
पुरुषांवर का भाळतात स्त्रिया? खासकरुन अशा गोष्टींवर ठेवतात विश्वास

आंबा

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंबा, व्हिटॅमिन सी, ए आणि के यांसारख्या एंटीऑक्सीडेंट्सने शरिराला देतो. हे सर्व पोषक द्रव्ये संक्रमण दूर ठेवण्यासाठी आणि ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करण्यासाठी विशेष काम करतात.

भाजींचे बियाणे

संशोधनानुसार, भाजींच्या बियांचे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह सारखी आवश्यक प्रथिने मिळतात, जी आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. ही सर्व प्रथिने शरिरासाठी आवश्यक असतात. सोबतच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Immune System
लिंबू महागले! लिंबाच्या जागी वापरा 'या' सहा गोष्टी

संतुलित आहार: योग्य पोषक तत्त्वे केवळ तुमची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठीच काम करत नाहीत, तर ते तुमच्या शरिरातील माइक्रोबायोमवरही परिणाम करतात.

व्यायाम करणे: व्यायामामुळे अस्वस्थता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. यासोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पुरेशी झोप: तज्ञानुसार 7 ते 9 तास चांगली झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.