खरोखरचे लेदर हँडबॅग कसे ओळखाल? वाचा काही टिप्स

खरोखरचे लेदर हँडबॅग कसे ओळखाल? वाचा काही टिप्स
Updated on

नागपूर : महिलांच्या सौंदर्यात भर घालते हँडबॅग (Leather handbag). कोणत्याही कार्यक्रमासाठी बाहेर पडताना, फिरायला जाताना किंवा खरेदीसाठी जाताना महिला बॅग जवळ बाळगत असतात. या बॅग विविध प्रकारच्या आणि विविध डिझाईनच्या असतात. यामुळे चांगल्यात चांगली बॅग खरेदी करण्यासाठी महिलांची धडपड सुरू असते. आपण इतरांपेक्षा वेगळे आणि चांगले दिसाव यासाठी त्या अनेक प्रकारच्या बॅग्ज खरेदी करतात. (How-do-you-identify-a-real-leather-handbag?-Read-some-tips)

महिलांसाठी हँडबॅग आवश्यक वस्तूंसह फॅशन स्टेटमेंट बनले आहे. बाजारात विविध प्रकारचे हँडबॅग उपलब्ध आहेत. मात्र, महिलांमध्ये लेदर हँडबॅग आजही लोकप्रिय आहे. लेदर हँडबॅग महिलांना चांगले लूक प्रदान करते. यामुळे स्त्रिया लेदर पर्सकडे जास्त आकर्षित होत असतात. खरोखरच्या लेदरपासून बनवलेल्या वस्तू महागड्या असतात. यामुळे बाजारात कमी किमतीत डुप्लिकेट लेदर बॅग आलेल्या आहेत.

खरोखरचे लेदर हँडबॅग कसे ओळखाल? वाचा काही टिप्स
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; दुसऱ्या दिवशीही मुसळधार

कमी किमतीत बॅग उपलब्ध होत असल्यामुळे महिला याकडे आकर्षित होतात. यामुळे त्यांची फसवणूक होते. यामुळे तुमच्या मनात प्रश्न येईल खरोखरचे लेदर कसे ओळखावे? लेदरची गुणवत्ता कशी आहे? हे किती प्रकार आहेत? ओरीजनल लेदर हँडबॅगची किंमत काय आहे? आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहोत. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

फिनिशिंगचा फरक

हे सर्वांना माहीत आहे की खरोखरचं चामडं जनावरांच्या त्वचेपासून तयार होत असते. यामुळे खरोखरच्या लेदरची लवचिकता जास्त असते. त्यापासून बनवलेल्या हँडबॅगमध्ये फिनिशिंग जास्त असते. बनावट लेदरमध्ये जास्त फिनिशिंग मिळत नाही. बनावट लेदर तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. यामुळे ते बाजारात कमी किमतीत उपलब्ध होत असते.

गंधाने ओळखा फरक

तुम्हाला खरोखरचा लेदर ओळखायचा असेल तर हँडबॅगचा वास ओळखणे फार महत्‍त्वाचे आहे. अस्सल लेदर प्राण्यांच्या त्वचेपासून बनविला जातो. त्यामुळे जनावरांच्या त्वचेचा वास येतो. तर बनावट लेदर प्लॅस्टिकपासून बनलेले असते. त्यामुळे प्लॅस्टिकचा वास येत असतो.

खरोखरचे लेदर हँडबॅग कसे ओळखाल? वाचा काही टिप्स
देवा... मी स्वप्नातही असा विचार केला नव्हता रेऽऽ

नमुन्यानुसार ओळखा

खरोखरच्या लेदरमध्ये अनेक प्रकारचे नमुने उपलब्ध आहेत. हे नमुने मानवी त्वचेप्रमाणेच असतात. या नमुन्यांमध्ये क्रॅक, संकोचणं यासारखे गुण पाहू शकतो. कधीकधी खरोखरच्या लेदरमध्ये डागही दिसून येत असतात. जेव्हा की बनावट लेदरमध्ये असा कोणताही प्रकार दिसून येत नाही.

खरोखरचा लेदर बदलतो रंग

खरोखरचे लेदर घासल्यास हलके लाल रंगाचे होते आणि त्यावर डाग दिसू लागतो. लेदरला मोडल्यास रंगात बदल देखील होतो. बनावट लेदर मोडल्यास वाकत नाही आणि जास्त जोर लावून मोडल्यास ते फाटल्यासारखे होते.

खरोखरचे लेदर हँडबॅग कसे ओळखाल? वाचा काही टिप्स
जि. प.च्या शाळांची राज्यात गंभीर स्थिती; शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

बॅग पूर्ण होण्याची काळजी घ्या

बाजारात गेल्यानंतर महिला चमकणाऱ्या उत्पादनांची निवड करीत असतात. खरोखरच्या लेदरच्या वस्तूंमध्ये एकदम चांगली फिनिशिंग नसते. कारण, प्राण्याची कातडी जाड असते आणि एकसारखी बारीक नसते. यामुळे खरोखरच्या लेदरपासून बनवलेल्या हँडबॅग कडक राहतात. तर बनावट लेदर चमकदार आणि गुळगुळीत असतात.

(How-do-you-identify-a-real-leather-handbag?-Read-some-tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.