Dosa Sticking to Iron Tava : लोखंडी तव्याला तुमचाही डोसा चिकटतो? 'या' ट्रिक्स ट्राय करा

बऱ्याचवेळा लोखंडी तव्याला डोसा चिकटतो तर काय करायचे?
Dosa Sticking to Iron Tava
Dosa Sticking to Iron Tavasakal
Updated on

Dosa Sticking to Iron Tava : डोसा हा साऊथ इंडियन खाद्य पदार्थ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. डोसाचे सर्वच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फॅन आहे. त्यामुळे अनेकजण सकाळचा नाश्ता असो की शनिवार रविवार साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये डोसा खायला जातात तर काही लोक घरीच डोसाचा आस्वाद घेतात पण अनेकदा घरी डोसा बनवताना डोसा बिघडतो किंवा लोखंडी तव्याला डोसा चिकटतो तर अशावेळी काही खास ट्रिक्स तुम्ही आवर्जून ट्राय करायला हव्यात.( How do you keep dosa from sticking to iron tawa)

बऱ्याचवेळा लोखंडी तव्याला डोसा चिकटतो तर काय करायचे? याविषयी सोनल गिरीष वेटे (Sonal Girish Vete) यांनी त्यांच्या nutribit.app या इंस्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर केलाय. यावर डोसा तव्यावर चिकटू नये, यासाठी खास उपाय सांगितले आहे.

उपाय:

  • तवा मोठ्या आचेवर १०-१२ min चांगला तापवून घ्या.

  • मग त्यावर ३-४ tbs तेल घ्या आणि सर्व तव्याला लाउन घ्या.

  • गॅस बंद करा.

  • तवा थंड झाला की सर्व तेल पुसून घ्या.

  • परत तवा गरम करुन घ्या.

  • तवा गरम झाला की गॅस कमी करुन करा आणि तेल+ पाणी एका कापडाने तव्याला लाउन घ्या.

  • डोसा चे पीठ एकाच दिशेने फिरवत पसरवून घ्या.

  • मग गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवा आणि डोसा नीट भाजून घ्या.
    डोसा मनाने काट सोडतो तेव्हा डोसा काढून घ्या किंवा हवे असेल तर पालटून दूसरी बाजू भाजून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()