Drinking Water : लठ्ठपणा कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर

Weight loss tips: उन्हाळ्यात शरीरात निर्जलीकरण होते. परंतु, तोंडात पाणी ठेवून हळूहळू पाणी प्यायल्याने पाणी चांगले शोषण्यास मदत होते, ज्यामुळे निर्जलीकरण टाळता येते.
how drinking water helps you in weight loss
how drinking water helps you in weight lossgoogle
Updated on

Weight Loss Tips : पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते हे आपणा सर्वांना माहीत आहे. पाणी शरीराच्या अवयवांचे आणि ऊतींचे संरक्षण करते आणि शरीरातील पेशींना पोषक घटक आणि ऑक्सिजन वाहून नेते. हे रोगांशी लढण्यास मदत करते. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

परंतु, बहुतेक लोकांना पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत नसते. यामुळे फायद्याऐवजी तोटा होऊ लागतो. अनेकदा लोक घाईने पाणी पितात. असे केल्याने लघवीद्वारे पाणी बाहेर येते, त्यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळत नाहीत.

तसेच, एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, कारण शरीराला पाण्यावर प्रक्रिया करण्यास वेळ लागतो. तसेच जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. यामुळे मेंदूच्या पेशी आणि शरीरात जळजळ होऊ शकते.

पाणी पिण्याचे काही नियम आहेत, जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहेत. आयुर्वेदानुसार पाणी नेहमी सावकाश प्यावे आणि घोटून प्यावे. यामुळे आपल्या तोंडात असलेली लाळही पोटात जाते आणि पचनक्रिया बरोबर राहते.

होलिस्टिक हेल्थ अँड वेलनेस कोच श्वेता गुप्ता पिण्याचे फायदे सांगतात. तज्ञ म्हणतात, "पाणी गिळू नका, परंतु ते तोंडात ठेवून हळूहळू प्या." यातून तुम्हाला अनेक आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात.'' (how drinking water helps you in weight loss)

पचनशक्ती मजबूत होते

यामुळे आपल्या तोंडात असलेली लाळ देखील पोटात जाते आणि पचनक्रिया मजबूत होते. तसेच, लाळेमध्ये नैसर्गिक अल्कधर्मी असते, ते पाण्यात मिसळते. यामुळे अन्नाचे विघटन आणि पचन होण्यास मदत होते. याशिवाय पाणी हळूहळू तोंडात ठेवून प्यायल्याने अन्न पचण्यास सोपे जाते.

हायड्रेटेड ठेवते

उन्हाळ्यात शरीरात निर्जलीकरण होते. परंतु, तोंडात पाणी ठेवून हळूहळू पाणी प्यायल्याने पाणी चांगले शोषण्यास मदत होते, ज्यामुळे निर्जलीकरण टाळता येते. याशिवाय डिहायड्रेशनचा शरीरावर तसेच मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा प्रकारे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

वजन कमी करणे

पाणी केवळ शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करत नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. घोटून पाणी प्यायल्याने जास्त भूक लागत नाही, त्यामुळे तुम्ही कमी खाता. यामुळे तुमचे वजन संतुलित राहते.

पुरेसे पाणी पिण्याचे फायदे (benefits of drinking water)

  • स्नायूंना मजबूत बनवते.

  • बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

  • शरीरातील विषारी घटक काढून टाकतात.

  • डोकेदुखी आणि मायग्रेन दूर करते.

  • तुम्हाला उर्जेने परिपूर्ण ठेवते.

  • आरोग्यासाठी पाणी

  • चयापचय मजबूत करते.

  • त्वचेवर चमक आणते.

  • वृद्धत्व आणि सुरकुत्या कमी करते.

  • सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या त्वचेशी संबंधित समस्या दूर करते.

  • निर्जीव केसांना नवजीवन देते.

  • युरिन इन्फेक्शन दूर करते.

  • किडनी निरोगी ठेवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.