नैराश्यावर मात करण्याची गुरुकिल्ली; जाणून घ्या यशाचा मार्ग

depression
depression
Updated on

तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि धकाधकीचं जीवन यामुळे व्यक्तींचा परस्परांसोबत असलेला संवाद हळूहळू कमी होत चालली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या कोषात राहू लागला आहे. त्यामुळे एकमेकांशी गप्पा मारणं, आपल्या मनात दडलेल्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणं या सगळ्याचं प्रमाण कमी झालं आहे. परिणामी, सध्या माणूस एकलकोंडा झाला आहे. म्हणूनच दिवसेंदिवस नैराश्यग्रस्तांचं प्रमाण वाढत आहे. आपलं मन मोकळं करण्यासाठी किंवा आपली समस्या ऐकून घेण्यासाठी सध्याच्या काळात कोणाला वेळ नाही. म्हणूनच नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्याच्या अनेक घटना कानावर पडतात. अनेकदा परिक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आलं तरीदेखील विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, परिस्थिती कोणतीही  असली तरी नैराश्यात न जाता किंवा कोणत्याही व्यक्तीचा आधार न घेता त्यावर मात करता येणं आपल्याला जमलं पाहिजे.  

नैराश्यावर करा अशी मात

१. कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करा -

कितीही वाईट किंवा बिकट परिस्थिती आली तरीदेखील त्याला निर्भीडपणे सामोरं जा. पुढे काय होईल हा विचार करण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी कसा सामना करता येईल याचा विचार करा. कितीही मोठं संकट असलं तरीदेखील त्यातून निघणारा मार्ग नक्कीच असतो. त्यामुळे संकटाचा विचार न करता त्यातून बाहेर पडण्याचा विचार करा. हे सारं काही करत असताना सतत स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. मनात अनेक नकारात्मक विचार आले. तरीदेखील काही जुन्या चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा आणि हसत रहा. जितकं आनंदी रहाल तितके यशाचे मार्ग लवकर सापडतील. 

२. स्वत: चा दिनक्रम ठरवा -

तुमची ध्येय लहान असो किंवा मोठी ती पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नांचा, ध्येयाचा पाठलाग करा. त्यासाठी मुळात स्वत:च्या अंगी शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुमचा दिनक्रम ठरवा.  ज्यातून आत्मविश्वास वाढेल, आनंद मिळेल अशी पुस्तक वाचा, थोरामोठ्यांशी गप्पा मारा आणि दिवसभरात कोणत्या वेळी कोणती काम करणार आहात ते ठरवून घ्या. त्यानुसारच संपूर्ण दिवसभर कामं करा.

३. गरजेपूरतंच जेवा -

अनेकजण एखादा पदार्थ आवडला की तो मनसोक्त खातात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त पोट भरलं जातं आणि सहाजिकचं त्यामुळे मग सुस्तपणा येतो. इतकंच नाही. तर सतत स्नॅक्स, जंकफूड खाल्ल्यामुळे वजनदेखील वाढतं. यात वजन वाढल्यामुळेदेखील अनेकांना नैराश्य येतं. त्यामुळे पोटाला जितकं गरजेचं आहे, तितकंच खा.

४. नवीन गोष्टी शिका -
 

सतत काही ना काही नव्या गोष्टी शिकत रहा. नव्या गोष्टी शिकल्यामुळे तुमच्यातील कुतूहल क्षमता वाढते आणि त्यातून सामाजिक ज्ञानातही भर पडते.

५. व्यायम करा -

व्यायाम करत असताना शरीरातून एन्डोर्फिंन्स स्त्रवत असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण, त्रास कमी होतो. तसंच सकारात्मक भावनाही जागृत होते.

६. आनंदी रहा अन् स्वत: वर विश्वास ठेवा -

आनंदी राहणं आणि स्वत: वर विश्वास ठेवणं ही खरं तर यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे कायम सकारात्मक विचार करा आणि आनंदी रहा. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.