Weight Loss Tips : काही मसाल्यांचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते का?

किचनमध्ये काही मसाले असे आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.
Weight Loss Tips
Weight Loss Tips esakal
Updated on

Weight Loss :

आपल्या वाढत्या वजनाला आपण स्वतः जबाबदार आहोत. बिघडलेली लाईफस्टाईल, ताणतणाव आणि खाण्याच्या सवयी यामुळे आपले वजन वाढले आहे. वाढलेल्या वजनामुळे आपल्याला अनेक आजार होत आहेत. आणि त्या आजारांचे गांभीर्य आपल्याला कळत नाहीये.

काही लोक आजही जुनी लाईफस्टाईल फॉलो करत आहेत. तर काही लोक लाईफस्टाइलमध्ये बदल करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर एक कामाची गोष्ट आहे.

Weight Loss Tips
Weight Loss Lifestyle : मैत्रिणींनो, Weight Loss साठी मासिक पाळीनंतर करा हा प्रयोग, वजनावर होईल थेट परिणाम

अति मसाल्यांचे सेवन केल्याने सुद्धा आपले वजन वाढू शकते असे म्हणतात. पण आपल्या किचनमध्ये काही मसाले असे आहेत ज्यांच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. होय हे खरे आहे. काही मसाल्यांचे सेवन करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर सुद्धा अशोकन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की,दररोज मसाल्यांचे सेवन करणे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ते कोणत्या प्रकारे आणि ते कुठले मसाले आहेत हे जाणून घेऊयात. (Weight Loss Tips In Marathi)

हळद

हळदीमध्ये असलेले करक्युमिन तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करते. हळद आपली मेटाबॉल्जिम वाढवते आणि फॅट कमी करते.

दालचिनी

विकतच्या मसाले पावडरमध्ये असलेली दालचिनी आपण खातो. पण अखंड दालचिनी कमीच सेवन करतो. दालचिनी तुमच्या रक्तातील साखरेवर नियंत्रित करते. आणि त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होतो.

Weight Loss Tips
MDH Everest Spices: एव्हरेस्ट, एमडीएचच्या अडचणी वाढणार? हाँगकाँग, सिंगापूरने बंदी घातल्यानंतर भारताने उचलले 'हे' मोठे पाऊल

काळी मिरी

आपली बिघडलेले पचन संस्था सुधारण्यासाठी काळीमिरी उपयुक्त ठरते. त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत काम करते अन् आपले वजन कमी होते.

वेलची

वेलची आपल्या पचनाच्या समस्या सोडवते आणि शरीरावर अतिरिक्त चढलेली सूज कमी करते.

आले

आल्याचा वापर डिटॉक्स वॉटरमध्ये केला जातो. कारण आले आपल्या वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवू शकतात. आल्यामध्ये असलेले गुणधर्म आपली पचन संस्था सुरळीत करतात.

 यासह तुम्ही नागरमोथा, गुळवेल, गवती चहा अशा औषधी वनस्पतींचे सेवन करूनही वजन कमी करू शकता. काही गोष्टींचा त्याग करून या गोष्टींचे सेवन वाढवलेत तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

Weight Loss Tips
Spices Adulteration : सावधान ! मसाल्याच्या पदार्थांत वाढतेय भेसळ

मसाले कसे फायदेशीर ठरू शकतात

तज्ञ सांगतात की आपलं वाढलेलं वजन हे आपल्या बिघडलेल्या पचनसंस्थेचे, आणि रक्तातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे असू शकते. त्यामुळे हे काही मसाले तुमच्या या समस्या कमी करतात आणि तुमचे वजन कमी करतात.

चयापचय वाढवणे: अनेक मसाल्यांमध्ये अशी संयुगे असतात जी चयापचय वाढवण्यास मदत करतात, जे पचनास मदत करतात.

मसाले पचनास मदत करतात. हे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. काही मसाल्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

रक्तातील साखरेचे नियंत्रण: दालचिनीसारखे काही मसाले रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. (Diet Tips)

वजन कमी करण्यासाठी हे मसाले आणि औषधी वनस्पती फायदेशीर ठरू शकतात, परंतु त्यांचा संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीत समावेश करून त्यांचा वापर केला पाहिजे, असे डॉ.सुधा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.