एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात तापमानात मोठी वाढ होत आहे. कडक उन्हामुळे एसीशिवाय राहणे अवघड होते. एसी हा लोकप्रिय उपाय असला तरी तो त्याचे आरोग्यावर दूषपरिणाम देखील होतात.
एसीमध्ये दीर्घकाळ बसणे किंवा काम केल्याने आरोग्यावर काही गंभीर परिणाम होतात. श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून ते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यापर्यंत एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने तुमच्या आरोग्यावर अनेक हानिकारक परिणाम होऊ शकतात.
हायड्रेटेड राहा
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभरात ७ ते ८ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी नारळ पाणी किंवा फळांचा रस प्यावा.
पंखे आणि क्रॉस-व्हेंटिलेशनचा वापर करा
हवा फिरवण्यासाठी आणि थंड हवेची झुळूक निर्माण करण्यासाठी पंखे एसीचा उत्कृष्ट पर्याय आहेत. हवेचा प्रवाह वाढवण्यासाठी पंखे धोरणात्मकपणे ठेवा आणि क्रॉस-व्हेंटिलेशनसाठी अनेक पंखे वापरण्याचा विचार करा. तुमच्या घराच्या विरुद्ध बाजूंनी खिडक्या आणि दरवाजे उघडल्याने हवेचा प्रवाह वाढतो आणि जागा नैसर्गिकरित्या थंड होऊ शकते.
पडदे वापरा
थेट सूर्यप्रकाश घरातील तापमानात लक्षणीय वाढ करू शकतो. यासाठी खिडक्या आणि दारांवर पडदे लावावे. यासाठी हलक्या रंगाचा वापर करावा.
सुती कपडे वापरा
उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी सुती आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावे. यामुळे घाम आल्यास सुती कापड शोषून घेतो. तसेच रात्री झोपताना सैल कपडे घालावे.
थंड पाण्याने आंघोळ
उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे उन्हाळ्यात घामोळ्या, पिंपल्य यासारख्या समस्या निर्माण होणार नाही.
उन्हात बाहेर पडू नका
उन्हाळ्यात काम असेल तरच घराबाहेर पडावे. सकाळी १० ते ४ दरम्यान बाहेर जाणे टाळावे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरते.
इतर उपाय
उष्णतेवर मात करण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता. यासाठी टेबल पंख्यासमोर बर्फाने भरलेली वाटी ठेवा. यामुळे रूममध्ये थंडावा जाणवेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.