अखेर मान्सूनचे आगमन झाले आहे. रिमझिम पाऊस पडला की खूप आनंद होतो, उष्णतेपासून दिलासा मिळतो. अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. तर पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलंही खेळताना दिसत आहे. अशावेळी काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याची शक्यता असते.
कारण, सर्वात जास्त संसर्गजन्य आजाराचं प्रमाण याच ऋतुत वाढत असतं. पावसाळा हा अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्ही कधी पावसात भिजत असाल तर काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला आजारी पडण्यापासून वाचवू शकता.
पावसात भिजल्यावर केस पूर्णपणे ओले होतात, अशा परिस्थितीत सर्वप्रथम केस पूर्णपणे कोरडे करावेत, ड्रायर वापरल्यास चांगले होईल. तुम्ही केस तसेच ओले ठेवले तर सर्दी, ताप तर काही लोकांना डोकेदुखी देखील होते.
जर तुम्ही पावसात भिजला असाल तर घरी आल्यावर गरम पाण्याने आंघोळ करा, यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होईल, यासोबतच पावसाच्या पाण्यात बॅक्टेरिया वगैरे असतात असे म्हणतात, अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया कायम राहिल्यास तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या येऊ शकतात.
पावसात भिजल्यानंतर लवकरात लवकर कपडे बदला, यामुळे तुम्हाला थंडी वाजणार नाही, ओले कपडे तसेच ठेवल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही वाढतो, लगेच कपडे बदलल्याने बुरशीजन्य संसर्ग पसरण्यापासून बचाव होतो.
पावसात भिजल्यानंतर, तुम्ही गरम चहा प्या, यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, शरीराचे तापमान संतुलित होते, तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि तुम्ही सर्दी, फ्लू इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकता.