Summer Skin Care
Summer Skin CareSakal

Sunscreen: उन्हाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन लावताना कोणती काळजी घ्यावी, वाचा सविस्तर

How to Apply Sunscreen On Face: उन्हाळ्यात त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने चिकट होत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
Published on

how to avoid stickiness after applying sunscreen

उन्हाळ्यात अनेक लोक सुर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरतात. सनबर्न आणि टॅनिंगची समस्या सनस्क्रीन लावल्याने कमी होऊ शकते. परंतु काही वेळा सनस्क्रीनमुळे चेहरा पांढरा आणि चिकट दिसू लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

  • मॉइश्चरायझर लावा

सनस्क्रीन लावण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. सनस्क्रीन लावण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर लावावे. यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा जाणवत नाही. ज्या लोकांची त्वचा काळी आहे त्यांनी सनस्क्रीन लावण्यापूर्वी मॉइश्चराइझर लावावे.

  • सनस्क्रीन जास्त लावू नका

त्वचेवर जास्त सनस्क्रीन लावणे घातक ठरू शकते. यामुळे चेहऱ्यावर पांढरे डाग आणि त्वचा चिकट होते. त्यामुळे योग्य प्रमाणात चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावे. 15 मिनिटं आधी सनस्क्रीन लावा.

Summer Skin Care
Summer Face Pack: उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावा 'हे' 4 कुलिंग फेस पॅक, मिळेल थंडावा
  • 15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे

तुम्ही बाहेर जाणार असाल तर किमान 15 मिनिटे आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेला सनस्क्रीन शोषून घेण्यास थोडा वेळ लागतो. यामुळे बाहेर जाण्यापूर्वी 15 मिनिटे सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.

  • अशा प्रकारे लावा सनस्किन

चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना जास्त घासू नका. यामुळे चेहऱ्यावर पांढरे डाग दिसणार नाही.

कोणताही सनस्क्रीन वापरला तरी या समस्या निर्माण होतात. यामुळे 15 ते 30 एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे. तसेच त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.