Monsoon Health Care : मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात करा या 5 गोष्टी, आजार दूर राहतील

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.
Monsoon Health Care
Monsoon Health Caresakal
Updated on

पावसाळ्यातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे गरजेचे आहे. मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.

निरोगी आहार

ताजी फळे, भाज्या, कडधान्य आणि प्रथिने यांचा समावेश असलेला संतुलित आणि पौष्टिक आहार मुलांना द्या. संत्री, लिंबू आणि आवळा यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

स्वच्छतेची काळजी घ्या

मुलांना हात धुण्याची सवय लावा, विशेषतः जेवण्यापूर्वी आणि बाहेरून आल्यानंतर. स्वच्छतेशी संबंधित सवयी मुलांना जीवाणू आणि विषाणूंपासून वाचवण्यास मदत करतात.

Monsoon Health Care
Health Care News : कंबरेच्या दोन्ही बाजूला चरबी वाढलीये? मग ‘या’ व्यायामांमुळे वाढलेली चरबी होईल वेगाने कमी

पुरेशी झोप

मुलांसाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेमुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीराचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते. मुलांना दररोज 8-10 तासांची झोप मिळाली पाहिजे.

हायड्रेशन

मुलांना पुरेसे पाणी पिण्यास प्रवृत्त करा. पावसाळ्यात मुलांना हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढता येतील.

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी

मुलांना नियमितपणे फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सामील करा. योगासने, खेळ आणि इतर उपक्रमांमुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता आणि पावसाळ्यात त्यांना आजारांपासून दूर ठेवू शकता.

Chitra kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com