Life Lesson : तुम्ही स्वत:मध्ये कराल 'हे' बदल तर नक्कीच फायदा होईल, गौर गोपाल दास यांचा मोलाचा सल्ला

Life Lesson By Motivational Speacker Gaur Gopal Das : गौर गोपाल दास यांनी नुकतेच काही उपदेश केले आहेत. जे तुम्हाला तुमच्या स्वभावात कोणते बदल करणे गरजेचे आहे याबद्दल सांगितले आहे.
Life Lesson By Gaur Gopal Das
Life Lesson By Gaur Gopal Dasesakal
Updated on

Life Lesson By Gaur Gopal Das :

गौर गोपाल दास हे मोटिवेशनल स्पीकर आहेत. ते इस्कॉन फाऊंडेशनशी संबंधित आहेत आणि त्यांनी लाखो लोकांना त्यांच्या साध्या राहणीमान अन् उच्च विचारसरणीने प्रेरित केले आहे. त्यांची पुस्तके, सोशल मीडियावरील व्हिडिओ यातून लोकांना प्रेरणा दिली आहे.

गौर गोपाल दास यांनी नुकतेच काही उपदेश केले आहेत. जे तुम्हाला तुमच्या स्वभावात कोणते बदल करणे गरजेचे आहे याबद्दल सांगितले आहे. तुम्ही या गोष्टी आचरणात आणल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे गौर गोपाल यांचे मत आहे.

Life Lesson By Gaur Gopal Das
Jalgaon Rural Life: रोघरी आता दोनच जीव; गावगाड्यात बदल! ग्रामीण राहणीमानाचा सेतू पुढे नेणारी यंत्रणाच कोलमडली

इतरांना सांगण्याआधी स्वत: बदला

गौर गोपाल दास हे नेहमी सांगतात की, बदल हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण योग्य वेळी बदल केलाच पाहिजे. पण,काही लोक इतरांनी स्वत:मध्ये कसा बदल करायला हवा याबद्दल चर्चा करतात. त्यामुळेच, गौर गोपाल दास म्हणतात की, बदलाची सुरूवात स्वत:पासून करा.

काहीवेळा असे प्रसंग येतात की एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी आपल्याला स्वत:मधील काही गोष्टी बदलाव्या लागतात. तर, त्या वेळीच बदला. नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा तुमच्यात छोटा बदल करून तुमचं मोठं काम होणार असेल.तर, नक्कीच स्वत:मध्ये बदल करा.

Life Lesson By Gaur Gopal Das
Healthy Life: बदलती जीवनशैली अन् व्यायामाकडे दुर्लक्ष केल्याने देशभरातील निम्म्याहून अधिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात

तुम्ही खुश राहता का

गौर गोपाल दास यांनी केलेला एक उपदेश नेहमी चर्चेत असतो. ते सांगतात की, तुमचा आनंद इतरांवर अवलंबून आहे. इतर लोकांनी तुमचं कौतुक केलं, कोणी तुम्हाला सुंदर म्हणालं, कोणी तुमच्या कामाबद्दल चांगलं बोललं तर तुम्ही आनंदी होता. पण हा आनंद क्षणभंगूर आहे. जर इतर लोकांनी तुम्हाला नावे ठेवली तर तुमचा आनंद दु:खात बदलतो.

त्यामुळे स्वत:च स्वत:ला आनंदी ठेवायला शिका. स्वत:ला प्रोत्साहन द्या, कौतुक करा. कारण, यामुळे तुम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल.

इतरांसाठी स्वत:मध्ये बदल करू नका

जेव्हा एखाद्याला आवडतं तसं राहण्याचा लोक प्रयत्न करतात. तेव्हा काहीवेळा स्वत:ची आवड विसरून जातात. कारण, ते सतत त्या व्यक्तीचा विचार करू लागतात. आणि स्वत:ची आवड काय आहे हे विसरतात.

त्यावर गौर गोपल दास म्हणतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता. किंवा ज्याच्या हाताखाली तुम्ही काम करत असता. तेव्हा तो व्यक्ती सांगतो म्हणून स्वत:मध्ये बदल करता. हे बदल, छोटे असतील तर ठिक आहे. पण हे बदल फार मोठे अन् तुमच्या मनाला पटणारे नसतील. तर इतरांच्या सांगण्यावरून बदलण्याची काहीही गरज नाही.

Life Lesson By Gaur Gopal Das
Work Life Balance: धावपळीच्या आयुष्यात कसा साधाल वर्क-लाईफ बॅलन्स? 'या' सोप्या गोष्टी येतील कामी

तुम्ही त्या व्यक्तीसाठी बदलाल पण कधीतरी मनात येईल की आपण त्या व्यक्तीसाठी इतके बदललो, पण, त्याने तुमच्यासाठी काही बदल केले का? जेव्हा नाही हे उत्तर येईल तेव्हा तुम्ही नाराज व्हाल. त्यामुळे कोणासाठी किती बदलावं याचा योग्य विचार करा अन् मगच स्वत:मध्ये बदल करा.

काही लोक शांत स्वभावाचे असतात. ते लोक अतिविचारी असतात. शांतीपूर्ण जीवन जगत असतात. त्या लोकांच्या मनावर कोणतंही ओझं नसतं. कारण,असे लोक स्वत:च्या चुकीची माफी मागतात अन् इतरांना माफही करतात.

तुम्ही ज्या लोकात मिसळता तुम्ही ही तसेच आहात

गौर गोपाल दास म्हणतात की तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकांसारखेच तुम्ही आहात. तुम्ही काही वेगळे नाही. ज्या लोकांमध्ये तुम्ही मिसळता ज्या लोकांसोबत काम करतात किंवा ज्या लोकांसोबत फिरायला शॉपिंगला जाता जे तुमची हक्काचे मित्र आहेत कुटुंबातील सदस्य आहेत अशा लोकांचेच एक प्रतिबिंब तुमच्या शरीरातही उतरते.

तुम्हाला आवडणाऱ्या ज्याच्याशी पटतं अशा लोकांच्या सहवासात तुम्ही सतत राहता. त्या लोकांची स्टाईल तुम्ही कॉपी करता. फक्त त्या व्यक्तीकडून वाईट गुण घ्यायचे की चांगले हे तुमच्या हातात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.