Oily Skin Tips : तेलकट त्वचेसाठी मॉईश्चरायझरची निवड करताय? मग, चेहऱ्यावर लावताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Oily Skin Tips : त्वचा कोणत्याही प्रकारची असो, तुम्ही व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर, त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Oily Skin Tips
Oily Skin Tipsesakal
Updated on

Oily Skin Tips : त्वचा कोणत्याही प्रकारची असो, तुम्ही व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर, त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की, चेहऱ्यावर मुरूम-डागांची समस्या निर्माण होणे, ब्लॅकहेड्स, पिंपल्स, डार्क सर्कल्स इत्यादी त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

खास करून ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी नियमितपणे त्वचेचे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉईश्चरायझिंग करणे फायद्याचे ठरते.

त्यामुळे, तुमचा चेहरा आयुष्यभर निरोगी आणि चमकदार राहील. तेलकट त्वचा असणाऱ्या अनेक व्यक्ती चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावायचे टाळतात. हे मॉईश्चरायझर लावल्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते, असा काहींचा गैरसमज असतो. मात्र, असे अजिबात नाही.

त्वचेवर मॉईश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. फक्त तेलकट त्वचा असणाऱ्यांनी त्वचेवर मॉईश्चरायझर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Oily Skin Tips
Scrubs For Oily Skin : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग तांदूळ आहे मदतीला! जाणून घ्या ‘हे’ होममेड स्क्रब्स

योग्य मॉईश्चरायझरची करा निवड

तेलकट त्वचेच्या व्यक्तींना आधीच मुरूम आणि ब्लॅकहेड्सची समस्या भेडसावत असते. त्यामुळे, या समस्या आणखी वाढू नये, यासाठी तुम्ही लाईटवेट आणि नॉन-कॉमेडोजोनिक फॉर्म्युला असलेले मॉईश्चरायझरची निवड करणे गरजेचे आहे. या प्रकारच्या मॉईश्चरायझरमुळे तुमची त्वचा चिकट आणि तेलकट दिसणार नाही.

वॉटर बेस्ड किंवा ऑईल फ्री मॉईश्चरायझर असेल तर तेलकट त्वचेसाठी हे अधिक चांगले आहे. यासोबतच हायलुरोनिक अ‍ॅसिड आणि ग्लिसरीन सारख्या घटकांनी युक्त असलेले मॉईश्चरायझर्स देखील तेलकट त्वचेसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. (Choose the right Moisturizer)

जेल किंवा सीरम बेस्ड फॉर्म्युला आवश्यक

तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉश्चरायझर किंवा लाईटवेट सीरमची निवड करायला काही हरकत नाही. जेल किंवा सीरम बेस्ड मॉईश्चरायझर्स लावल्यानंतर तुमची त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसू शकते. या प्रकारचे मॉईश्चरायझर्स त्वचेवर लावल्यानंतर ते तेलकट त्वचेमध्ये लवकर शोषले जातात. त्यामुळे, त्वचेतील रोमछिद्रांमध्ये धूळ आणि घाण जमा होण्याची शक्यता कमी होते. (Gel or serum based formula required)

Oily Skin Tips
Oily and Greasy Hair Problems : तेलकट आणि चिकट केसांपासून सुटका करायची आहे? मग, ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()