Ceiling fan cleaning tips: 5 मिनिटात स्मार्ट पद्धतीनं पंखा स्वच्छ करा, या ट्रिक्स वापरून पाहा

सीलिंग फॅन साफ करणे हे खूप अवघड काम आहे.
fan
fan sakal
Updated on

कधी-कधी सीलिंग फॅन खूप घाण होतात. त्यांच्यावर कार्बनयुक्त धुळीचा जाड थर साचू लागतो. असे असतानाही सिलिंग फॅनच्या साफसफाईकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. सीलिंग फॅन साफ करणे हे खूप अवघड काम आहे, त्यामुळे बरेच लोक ते टाळतात. काही सोप्या पद्धतींनी तुम्ही काही मिनिटांत सिलिंग फॅन साफ ​​करू शकता.

जुने उशीचे कव्हर वापरा: सीलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी पिलो कव्हर वापरता येते. उशीच्या कव्हरने पंखा साफ करणे खूप सोपे आहे. यासाठी प्रथम पंख्याच्या एका ब्लेडवर उशीचे कव्हर जसे तुम्ही उशी घालता तसे घाला. नंतर उशीचे कव्हर दोन्ही हातांनी सरकवून स्वाइप करा. याच्या मदतीने पंख्याची घाण काही मिनिटांत दूर होईल. यासोबतच घरातील वस्तू आणि तुम्ही धुळीपासून सुरक्षित राहाल.

fan
Sabudana Health Benefits : साबुदाणा खाणे खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ञांचे मत

व्हॅक्यूम क्लिनरची मदत घ्या: बरेच लोक व्हॅक्यूम क्लिनरने सोफा आणि कार्पेटसारख्या गोष्टी स्वच्छ करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सीलिंग फॅन साफ ​​करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरचीही मदत घेतली जाऊ शकते. यासाठी खुर्चीवर उभे राहून व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने पंखा स्वच्छ करा. यामुळे सर्व घाण क्षणार्धात नाहीशी होईल आणि तुमचा पंखा अगदी स्वच्छ दिसेल. यासोबतच पंख्यावरील धूळ आणि मातीमुळे तुम्ही घाण होण्यापासून वाचाल.

सॉक्स वापरा: अनेक जुने सॉक्स घरात असतात. त्यांचा वापर करून तुम्ही पंखा सहज स्वच्छ करू शकता. यासाठी फुल साइज कॉटनचे मोजे थोडेसे ओले केल्यानंतर ते पिळून घ्या. त्यानंतर पंख्याच्या ब्लेडला या सॉक्सने झाकून टाका. नंतर सॉक्सचा शेवटचा भाग धरा आणि बाहेरून स्वाइप करा. त्यामुळे सिलिंग फॅनवर साचलेली घाण निघून जाईल आणि घाणही खाली पडणार नाही.

fan
Weight Loss: या सवयी जिमपेक्षा जास्त फायदेशीर, वजन कमी करण्याचा सोपा उपाय!

या गोष्टी लक्षात ठेवा : सिलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. सर्वप्रथम, लाईट बंद करा, जेणेकरून तुम्हाला विजेचा झटका बसण्याचा धोका होणार नाही. यानंतर आपले डोके आणि चेहरा कापडाने झाकून घ्या, त्यानंतरच पंखा स्वच्छ करा. याच्या मदतीने तुम्ही पंख्यावरील कार्बनयुक्त धूळ आणि मातीपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.