Freezer Cleaning : उन्हाळ्याच्या दिवसात आपण फ्रिजचा सर्वाधिक वापर करतो. अर्थात प्रत्येक घरी फ्रिजही असतेच. फ्रिज ही वस्तू ठंड ठेवण्यापासून ड्रिंक्स, आईस क्यूब आणि जेवण ताजे ठेवण्यासाठी वापरतो. कधी कधी हाच फ्रिज अचानक जास्त बर्फ बनवायला लागतो. सोबतच फ्रीजरमध्ये स्मेलही येतो.
अशात जर तुमच्या घरी फ्रीजरमध्ये बर्फाचा पहाड बनत असेल आणि तुम्हाला कळत नसेल काय करावं तर तुम्ही काही खास उपाय करू शकता. चला तर जाणून घेऊया. (how to clean freezer ice build up)
वारंवार फ्रिज उघडू नये
जर तुमच्या फ्रीजर मध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ बनत असेल तर यामागील कारण दमटपणा असू शकतो. हा दमटपणा थांबवण्यासाठी फ्रिजला वारंवार उघडू नये. कारण तुम्ही जेव्हा उघडता तेव्हा गरम हवा आतमध्ये जाते आणि थंड्या हवेत मिक्स होते. त्यातून दमटपणा तयार होतो आणि नंतर याचा बर्फ बनतो.
फ्रिजरचं तापमान सेट करा
आपल्या फ्रीजर मध्ये बर्फ जमा होऊ नये असे वाटत असेल तर फ्रिजरच्या तापमानाकडे लक्ष द्या फ्रीजरचं तापमान -18 डिग्री फारेन हाइट वर सेट करा. जर तुमचा फ्रीजर यापेक्षा वरील तापमानपेक्षा जास्त सेट असेल तर त्या तापमानाला कमी करा नाहीतर फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा होणार.
फ्रिजला सामानाने फुल ठेवा
फ्रीजरमध्ये बर्फ जमा न व्हावे यासाठी फ्रिजमध्ये भरपूर सामान भरावे. कारण जेव्हा फ्रीजरमध्ये भरपूर जागा असते तेव्हा दमटपणा आणखी तयार होतो जो नंतर बर्फ बनतो.
फ्रिजरला साफ ठेवा
फ्रीजरला नियमितपणे साफ ठेवा. साफ सफाई केल्यामुळे बर्फ जमा होण्याचा चान्स कमी असतो. पण डिफ्रॉस्ट होऊ द्या. फ्रीजरचा डिफ्रॉस्ट करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे सर्व खाद्यपदार्थ काढून घ्या आणि या सर्व पदार्थांना आईस बॉक्स मध्ये ठेवा. त्यानंतर फ्रीजरला एका तासासाठी बंद ठेवा त्यामुळे पुर्णपणे डिफ्रॉस्ट होणार. यामुळे तुमची फ्रिज खुप चांगल्या पद्धतीने साफ होणार.
फ्रिजच्या मागे कॉइलचा एक सेट असतो ज्याला कंडेनसर कॉइल म्हटले जाते. हे आपल्या फ्रिजला सुरू ठेवण्यासाठी आणि थंड ठेवण्यासाठी मदत करतं. जेव्हा हा कॉइल खराब होतो तेव्हा बर्फ झाकले जातात आणि आपला फ्रिज ठिक प्रकारे काम करू शकत नाही ज्यामुळे फ्रिजमध्ये बर्फ जमा होतात. यासाठी फ्रिजला अनप्लग करा आणि कंडेनसर कॉइल्सला साफ करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.