cooking Oils: तेलाशिवाय स्वयंपाक कसा करायचा?

कोणते तेल वापरायचे नाही? आहारतज्ञ काय सांगतात?
cooking oil
cooking oilsakal
Updated on

जेवण तेलाशिवाय तयार होऊ शकतं? असा प्रश्न जर विचारला तर तुम्ही म्हणाल नाही. पण आहारतज्ञ डॉ. मृदूल कुंभोजकर (Dr. Mrudul Kumbhojkar) यांनी तेलाशिवाय उत्तम जेवण कसं करता येईल? सोबतच कोणतं तेल वापरावं? आणि किती प्रमाणात वापरावं? याविषयी ट्वीट करत माहिती दिली आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

तेलाशिवाय स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न प्रत्येक स्त्री ला पडेल. पण सुरवातीला आपण जेवण कशात बनवावं या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर पाहू. तुम्ही खालील प्रमाणे प्राधान्य देऊ शकता. साजूक गाईचं तूप, कोल्डप्रेस खोबरेल तेल, एक्सट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि शेंगदाणा तेल.

cooking oil
Oil Price: कच्चं तेल स्वस्त पण पेट्रोल डिझेलचे दर का महाग? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण

कोणते तेल वापरायचे नाही?

काही तेल PUFA (unsaturated) मध्ये जास्त असतात आणि म्हणून या तेलाचा वापर करू नये.

1. कॉटनसीड ऑईल्स किंवा कोणतेही सीड ऑईल्स.

2. सॅफफ्लॉवर ऑइल, सनफ्लॉवर ऑइल

3. मस्टर्ड ऑइल (मोहरी तेल)

4. हायड्रोजिनेटेड वेजीटेबल ऑईल्स (डालडा)

cooking oil
Edible Oil :खाद्यतेलाच्या दरांमध्ये मोठी घसरण; पिशवीमागे २० ते ३० रु. घट

तुम्हाला प्रश्न पडला असेल की तेलाशिवाय खायचं कसं? तर यासाठी काही ऑप्शन्स डॉ मृदूल कुंभोजकर यांनी दिले.

  • चपाती ऐवजी फुलके बनवा.

  • ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी करता येईल.

  • कोशिंबीरीचा जेवणात भरपूर समावेश करा.

  • कुकर मध्ये डाळ लावताना त्यातच लसूण, आणि जिरे घालून ठेवा, म्हणजे फोडणीचं वरण करायची गरज नाही. तशीच डाळ खायची.

  • मोड आलेल्या कडधान्याचा वापर भरपूर करा.

  • भाजी करताना हलक्या एक चमचा तुपात जस्ट फोडणी द्या. तुपाने मस्त चव लागते.

cooking oil
Oil Price: कच्चं तेल स्वस्त पण पेट्रोल डिझेलचे दर का महाग? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले स्पष्टिकरण

डॉ मृदूल कुंभोजकर सांगतात की फोडणीला तेल डायरेक्ट भांड्याने ओतू नका, एक चमचा तेल खूप आहे. (One tablespoon) PuFa, MuFa यापेक्षा सॅच्युरेटेड फॅट्स चांगले, असेही त्या म्हणतात.

एक चमचा तूप रोज खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्याने वजन वाढणार नाही. तर व्हिटॅमिन A, D, E आणि K हे शरीरात absorb होतात. सोबत तेल-तुपाने जाड होत नाही. असेही त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.