Kids Bedroom Decoration Ideas: लहान मुलांची रूम सजवा अशा प्रकारे, फॉलो करा या टिप्स

अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी मुलांची खोली स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवली पाहिजे.
Kids Bedroom
Kids Bedroomsakal
Updated on

आजकाल बहुतेक लोक घरात मुलांना वेगळी रूम देतात. पण मुलाची रूम सजवणे हे खूप अवघड काम आहे. अशा परिस्थितीत सजावटीच्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही मुलांच्या रूमला उत्तम लुक देऊ शकता. या पद्धती केवळ रूमला सुंदर लुक देण्यास मदत करतील असे नाही तर मुलांना ते पाहून खूप आनंद होईल.

घरात मुलांसाठी स्वतंत्र खोली असल्यास, मुलांना त्यांच्या रूममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडते, म्हणून, पालकांनी आपल्या मुलांची खोली अशा प्रकारे सजवणे महत्वाचे आहे. जेणेकरून मुलांना सकारात्मक वातावरण मिळेल. मुलांची खोली सजवण्याच्या पद्धती जाणून घेऊया.

खोलीचा रंग ठरवा

मुलांना रंगीबेरंगी गोष्टी जास्त आवडतात. अशा स्थितीत मुलांच्या खोलीला त्यांच्या आवडत्या रंगात पेंट करणे चांगले होईल. तुम्ही यासाठी थीम देखील ठरवू शकता. जर तुमचा वास्तूवर विश्वास असेल तर खोलीची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खोलीला वास्तुनुसार कलर देऊ शकता.

Kids Bedroom
Workout Tips रिकाम्यापोटी वर्कआऊट करावे का? जाणून घ्या फायदे व तोटे

सुंदर आणि सुरक्षित फर्निचर ठेवा

मुलांच्या खोलीसाठी फर्निचर सेट करताना, सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या. खोलीत धारदार आणि हँगिंग फर्निचर कधीही ठेवू नका. तसेच, डबल स्टोरी किंवा हाय बेड सेट करू नका. यामुळे मुलांना दुखापत होऊ शकते. खोलीला सुंदर लुक देण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी मच्छरदाणी वापरू शकता.

स्टडी टेबल सजवा

तसेच मुलासाठी स्टडी टेबल नीट सेट करा. रिव्हॉल्व्हिंग स्टडी टेबल आणि चेअर वापरू नका. यामुळे मुले टेबल आणि खुर्ची हलवू शकतात, ज्यामुळे त्यांना दुखापत होऊ शकते. यासोबतच तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे देखील सजवू शकता.

भिंती सजवा

खोलीला आकर्षक लूक देण्यासाठी तुम्ही मुलांच्या आवडत्या वॉलपेपरने भिंती सजवू शकता. ज्यावर कार्टून, स्काय किंवा सुंदर फुले असू शकतात. यामुळे खोली सुंदर दिसेल, आणि मुले भिंतींना घाण करू शकणार नाहीत आणि भिंती स्वच्छ राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()