अग्गबाई सासूबाई! सासूशी आईसारखं नातं निर्माण करायचंय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा

अग्गबाई सासूबाई! सासूशी आईसारखं नातं निर्माण करायचंय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा
Updated on

लग्न करताना ज्याप्रमाणे आपला पार्टनर महत्वाचा असतो. त्याप्रमाणे त्याच्या घरातील सदस्य कसे आहेत, हे पाहाणे महत्वाचे ठरते. मुलींचा सगळ्यात जास्त संबंध येतो तो सासुशी. घरातल्या चालिरिती, स्वयंपाक, घरातल्यांना काय हवं नको ते पाहाणे, पाहुण्यांचे आगतस्वागत बरीच वर्षे त्यांनीच सांभाळलेले असते. त्यामुळे नव्या सुनेला त्यांच्याबरोबर जुळवून घेणे अगदी महत्वाचे असते. आता काही घरी हा संवाद अतिशय छान घडतो. काही ठिकाणी तो घडायला खूप वेळ लागतो. तर काही ठिकाणी दोघींच जमतही नाही.

अशावेळी लग्न ठरल्यावर तुम्ही तुमच्या भावी सासूशी काही गोष्टींवर संवाद साधू शकता. जर तुम्हाला तुमच्या दोघींचे नाते अतिशय मोकळे हवे असेल. तुम्ही कश्या आहात नेमक्या हे सासूला कळावे अशी तुमची इच्छा असेल तर त्यांना जेवायला न्या, गर्दीपासून दूर बसा, आवडते पदार्थ आणि ड्रिंकचा आस्वाद घेत दोघी एकमेकींना अपेक्षा काय आहेत, याविषयी मनमोकळेपणे गप्पा मारू शकता. मात्र या 5 विषयांवर संवादाचा भर द्या.

अग्गबाई सासूबाई! सासूशी आईसारखं नातं निर्माण करायचंय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा
Be Happy: मनातून फुलणाऱ्या आनंदामागची 4 रसायनं

सिक्रेट्स- तुम्हाला तुमची उत्तर मिळविण्यासाठी अत्यंत कौशल्याने काही प्रश्न विचारावे लागतील. ज्या गोष्टींची तुम्हाला आधी जाणीव असणे महत्वाचे वाटते अशा गोष्टींना सिक्रेट्समध्ये स्थान द्या. तुम्ही लग्नाविषयी, तुमच्या नात्याविषयी अत्यंत गंभीरपणे विचार करत आहात हे सांगून जोडीदार आणि घराविषयीच्या दोन गोष्टी कोणत्या आहेत याविषयी तुम्ही सासूला विचारा. पण असे करताना त्यांना टेन्शन येऊ शकते.अशावेळी आधी हलक्या-फुलक्या गोष्टींपासून सुरूवात करा, मग हळूहळू सिक्रेट्स पर्यंत पोहोचा. पण या गोष्टी सांगाच म्हणून मागेही लागू नका.

खाण्याविषयी चर्चा- माणसाला खूश ठेवण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात. जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा एखादी आवडता पदार्थ खायला मिळाला की भूकही भागते आणि मनही. प्रत्येकाच्या खाण्याच्या पद्धती, आवडी-निवडी वेगळ्या असतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला कशाप्रकारे खायला आवडत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पार्टनर आणि तुमच्या संवादात याबद्दल चर्चा झाली असली तरीही तुम्ही सासूला याबद्दल अधिक माहिती विचारा. कारण यामुळे आपल्या मुलाविषयी हिला काळजी वाटते हा संदेश त्यांच्यापर्यंत जाईल.

सुट्टीवरून संवाद- प्रत्येक घरात सुट्टीचे प्लॅनिंग वेगवेगळेे असते. सुट्टी कशी घालवायची याच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. तुम्ही तुम्हाला काय वाटते हे स्पष्टपणे सांगा. मुख्य सुट्ट्यांमध्ये तुम्ही सगळ्यांबरोबर प्रवासाचा बेत आखाल. तर, काही सुट्ट्या या तुम्ही फक्त दोघेच एकत्र वेळ घालवण्यासाठी वापराल. तसेच मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाल, याविषयी कल्पना देताना मनमोकळेपणाने चर्चा करा. सासूला तुमचा मुद्दा पटवून दिल्यास कोणतही गैरसमज होणार नाहीत.

अग्गबाई सासूबाई! सासूशी आईसारखं नातं निर्माण करायचंय? या पाच गोष्टी लक्षात ठेवा
तुम्ही प्रेमात पडला आहात का? जाणून घ्या कसे ओळखाल

मुलांचा विषय- हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. लग्नानंतर लगेच किंवा वर्षभरात मुल व्हावे, अशी सासरच्यांची इच्छा असते. ते त्यासाठी मुलीचा पिच्छा पुरवातात. याबतीत तुमचे आणि जोडीदाराचे काय संभाषण झाले आहे त्याची स्पष्ट माहिती सासूला द्या. तुम्हाला विशिष्ट वेळ हवा असल्याने ती वेळ आल्यावरच तुम्ही मानसिकदृष्ट्या मुलासाठी तयार असाल याची जाणीव त्यांना करून द्या.

त्यांना सुरक्षित वाटू द्या- प्रत्येक आई साहजिकच आपल्या मुलांबद्दल थोडी पझेसिव्ह असते. त्यामुळे त्यांना तुमच्याविषयी सुरक्षित वाटणे गरजेचे आहे. अशावेळी त्यांना स्पष्ट सांगा की तुम्ही तिला कुटूंबातून बाहेर काढणार नाही. त्या सर्वात पहिल्या आहेत. मग तुम्ही आहात. त्यामुळे त्यांचे स्थान कायम वरचेच असेल. याची कल्पना दिल्याने त्यांना थोडे हलके वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.