अनेकांचे उत्त्पन्न मर्यादित असते. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी काय करावे, याबाबत ते चाचपडत असतात. पण जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सधन आणि श्रीमंत व्हायचे असेल तर, काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
अनेक लोकांना आपण श्रीमंत (Rich) व्हावे, असे वाटते. करोडपती होण्याची स्वप्ने तर लोकं पाहत असतातच. पण सगळ्यांनाच यश (Success) मिळतं असं नाही. काहीच लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येता. लोकांना सुंदर घरे, महागड्या कार आणि सुट्ट्या आरामात घालविण्यासाठी पुरेसा पैसा हवा आहे. पण श्रीमंत होण्याचा खरा अर्थ काय आणि त्यासाठी काय आवश्यक आहे हे अनेकांना माहीत नाही.
पण, अनेकांचे उत्त्पन्न मर्यादित असते. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी काय करावे, याबाबत ते चाचपडत असतात. पण जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सधन आणि श्रीमंत व्हायचे असेल तर, काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे बचत करायला सुरू करणे. तुमच्या बचतीवर जास्तीत जास्त परतावा मिळवणे ही श्रीमंत होण्याची मूलभूत अट आहे. यासाठी काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे. (How to Get Rich)
एखादी गोष्ट दुसऱ्यांपेक्षा चांगली करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. त्यासाठी शिका, सराव करा, त्याचे मूल्यमापन करा आणि ते परिष्कृत करा. बहुतेक खेळाडू किंवा कलाकार हे करोडपती आहेत कारण ते त्यांच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करतात. तुमच्याकडेही असे कौशल्य असेल तर ते वापरून तुम्हाला त्यातून भरीव परतावा मिळू शकतो. यासाठी सुरूवात करताना तुम्हाला कोणती कौशल्ये विकसित करायची आहेत ते शोधा. त्याच कौशल्यामुळे करोडपती झालेल्या जगातील दहा सर्वोत्कृष्ट लोकांची यादी बनवा. त्यांचा अभ्यासल करा. त्यांच्या कष्टातून प्रेरणा घेऊन तुम्ही आपल्या प्रगतीचा मार्ग तयार करा. (How to Get Rich)
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून सुरुवात पैसे वाचविण्यास सुरूवात करणार असाल तर वर्षाला एक लाख रूपये गुंतवा. वयाच्या 60 व्या वर्षी पाच कोटी रुपये तुम्हाला मिळतील. यासाठी 12% वार्षिक परतावा अपेक्षित आहे. जर गुंतवणुकीला सुरुवात होण्यास 10 वर्षांचा विलंब झाला, तर तेवढीच संपत्ती वाढवण्यासाठी वार्षिक 3.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.जर तुम्ही वयाच्या 45 व्या वर्षी बचत करायला सुरुवात केली तर पुढील 15 वर्षात 5 कोटी जमा करण्यासाठी वार्षिक 12 लाख रुपये गुंतवावे लागतील. (How to Get Rich)
दरवर्षी बचतीची रक्कम वाढविल्याने तुम्ही तुमचे आर्थिक उद्दीष्ट लवकर साध्य करू शकाल. जर तुम्ही तुमची बचत आणखी वाढवू शकत नसाल तर महागाईमुळे तुमची बचत तशीही वाढणार नाही. मात्र यासाठी मदत हवी असेल तर, स्टेप-अप एसआयपी तुमच्या गरजेनुसार तयार केला आहे. प्रत्येकासाठी एका वर्षात एसआयपीच्या रकमेत 10% वाढ होणे यासाठी आवश्यक नाही. तुम्ही फक्त पाच टक्के वाढ करू शकता. (How to Get Rich)
तुम्ही हुशारीने बचत करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने तुम्हाला उत्तम परतावा मिळण्यास मदत होईल. महत्वाचे म्हणजे तुमच्या गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ अगदी साधा ठेवा. अनेक गुंतवणूकदार परताव्याच्या जास्त अपेक्षा ठेवण्याची चूक करतात. पण, परतावा पाहिल्यानंतरच अपेक्षा करा. (How to Get Rich)
एका गुंतवणुकीचे पैसे दुसऱ्या कामासाठी लावू नका. कारण यामुळे तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढावे लागतील आणि गुंतवणुकीची योग्य वाढ होणार नाही. त्यासाठी गुंतवणूक सुरक्षित करणे गरजेचे आहे. गुंतवणूक सुरक्षित करण्याचा एक मार्ग म्हणजे आपत्कालीन निधी तयार करणे. असा निधी तुम्हाला आपत्कालीन मदत देईल.(How to Get Rich)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.