Jeans Hacks : काळी जीन्स पांढरी पडलीय? फक्त ५ रुपयात करा नव्यासारखी

अशी पांढरी पडलेली जीन्स घालून ऑफिसला जाणं जरा लाजिरवाण वाटतं, मित्रांमध्येही उगाच कोणी टिंगल करेल...
Black Jeans Hacks
Black Jeans Hacksesakal
Updated on

Black Jeans Hacks : मुलांच्या असो वा मुलींच्या प्रत्येकाच्या कपाटात काळी जीन्स असतेच. मुळात काळी जीन्स आपल्या प्रत्येक लुकसोबत परफेक्ट जाते. सगळेच नेहमीच काळ्या जीन्सला प्राधान्य देतात. पण काळी जीन्स घेण्याचे काही तोटे सुद्धा आहेत आणि ते म्हणजे कितीही ब्रॅंडेड जीन्स घ्या एकावेळेनंतर ती पांढरी दिसायला लागते.

Black Jeans Hacks
Perfect Jeans Tips: जीन्स आवडते तर आहे पण फिट बसत नाही? परफेक्ट जीन्ससाठी या टिप्स निवडा

हा प्रॉब्लेम खूप गहन आहे कारण अशी पांढरी पडलेली जीन्स घालून ऑफिसला जाणं जरा लाजिरवाण वाटतं, मित्रांमध्येही उगाच कोणी टिंगल करेल का असं वाटू लागतं. पण आता जीन्स फक्त पांढरी झाली किंवा त्यावरती पांढऱ्या लाइन्स दिसायला लागल्या म्हणून ती वापरण सोडणं बरोबर नाही ना?

Black Jeans Hacks
Zoo Jeans : चक्क खरेखुरे वाघ सिंह बनवतात ही जीन्स , किंमत बघून चक्कर येईल

या सार्वजनिक प्रॉब्लेम वर खूप सोप्पा आणि एकदम स्वस्त उपाय म्हणजे जीन्सला डाय करणं आणि तेही कोणाकडे बाहेर जाऊन नाही तर घरच्या घरी. आता तुम्ही म्हणाल घरच्या घरी कसं डाय कसं करणार? खूप सोप्पं आहे, चला याच्या स्टेप्स बघूयात.

Black Jeans Hacks
Womens Jeans Style : फक्त २००० च्या आत असलेल्या या जिन्स तुमच्याकडे असल्याच पाहिजेत..

आपल्या लाडाच्या जीन्सचा रंग परत आणा...

स्टेप्स :

१. सर्वात आधी एका पातील्यात पाणी उकळायला ठेवा.

२. आता त्यात ४ चमचे मीठ टाका.

३. पाणी उकळलं की ते एका बादलीत काढून घ्या. ही बादली शक्यतोवर जुनी घ्या, कारण काळा रंग बादलीला राहू शकतो आणि यावरून आईचा ओरडा मिळू शकतो.

Black Jeans Hacks
Old Jeans Reuse Ideas : जुनी जीन्स फेकून द्यायचा विचार करताय? पहा आधी या वस्तू मग ठरवा

४. त्यात आता फक्त पाच रुपयाला येणारी काळ्या रंगाची कपडे डाय करण्याची पुडी टाका. ही पुडी तुम्हाला आरामात किराणा दुकानात किंवा कटलरीच्या दुकानात मिळेल.

५. आता एका काठीच्या मदतीने पूर्ण पाणी नीट ढवळून घ्या अन् त्यात आपली जीन्स टाका.

६. ही जीन्स पण काठीने पूर्ण भिजवून घ्या. हात टाकू नका नाहीतर हाताला चटका लागेल.

Black Jeans Hacks
Jeans : रोज वापरत असलेली पहिली जीन्स कोणासाठी बनवली होती माहितीये?

७. अर्धा पाऊण तासाने पाणी थोडं कोमट झालं की जीन्स आपल्या हाताने जरा फिरवून भिजवून घ्या म्हणजे जीन्सच्या प्रत्येका बाजूला रंग लागेल.

८. तुम्ही ही जीन्स रात्रभर किंवा ४-५ तास तशीच पाण्यात ठेवू शकतात.

९. आता जीन्स त्या पाण्यातून काढून स्वच्छ पिळून घ्या आणि वाळायला ठेवून द्या.

Black Jeans Hacks
Denim Jeans : डेनिम जीन्स धुण्याची योग्य पद्धत कोणती ?

१०. एका दुसऱ्या भांड्यात साधं पाणी घ्या आणि त्यात ३-४ चमचे मीठ घ्या आणि त्यात ही जीन्स दोन तासांसाठी भिजत घाला.

११. एकदा जीन्स स्वच्छ पाण्यात पिळून घ्या आणि परत वाळत घाला.

१२. तुमची जुनी जीन्स अगदी नव्या सारखी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.