काही लोकांची दाढी त्यांच्या लूकला शोभनारी असते. सध्याच्या पिढीसाठी दाढी वाढवणे ही एक फॅशन आणि ट्रेंड होऊन बसला आहे. त्यामुळे अनेकजण दाढी वाढवतात. यानंतर या फॅशनमध्ये अनेक प्रकार येतात. अशावेळी काही नवीन ट्राय करायला गेल्यास बऱ्याचवेळा दाढी वाढत नाही. किंवा कुठे लहान मोठी अशी तिची वाढ होते.
दाढीची ही समस्या अनुवांशिकतेमुळेही येऊ शकते. मात्र यामुळे अनेकजण नाराज होतात. आपली दाढी चांगली वाढावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जाड दाढी वेगाने कशी वाढवायची यावर काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे जाड दाढी सहज आणि लवकर मिळू शकते.
त्वचेची काळजी घ्या
तुम्हाला चांगली दाढी हवी असेल तर तुमची त्वचाही चांगली ठेवली पाहिजे. मृत त्वचेचाही काहीवेळा दाढीच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. यासाठी तुम्ही एक चांगला मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचाही चांगली राहील आणि दाढी वाढण्यास मदत होईल. दाढीखालील त्वचा सक्रिय ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी चेहरा धुणे आणि दाढीचा कंगवा वापरणे हे उपायही मदत करतील. यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढते आणि जुनी त्वचा निघून जाते. जलद रक्ताभिसरणामुळे दाढीच्या मुळांपर्यंत अधिक पोषक द्रव्ये पोहोचतात. स्क्रब वापरणेही फायदेशीर होऊ शकते.
रोज व्यायाम करा
काही पुरुषांमध्ये नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्यांची दाढी दाट आणि घट्ट असते. मात्र हे अनेकांचा बाबतीत होत नाही. कदाचित त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असू शकते. त्यामुळे दाढीही विरळ दिसत असते. व्यायामामुळे तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढू शकते आणि रक्ताभिसरणही वाढते. टेस्टोस्टेरॉन हा घटक केसांच्या निरोगी वाढीसाठी जबाबदार मानला जातो. व्यायामामुळे डीएचटी म्हणजेच डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते.
तणावात राहू नका
कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. कारण जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल वाढते. ज्यामुळे टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर तुमच्या तणावामुळे रक्तवाहिन्याही आकुंचन पावतात. अशावेळी केसांच्या मुळांपर्यंत पोषक घटक पोहोचणे कठीण होते. तुम्ही जितका कमी ताण घ्याल, तितकी दाढी वाढण्यास मदत होईल. तणाव कमी करण्यासाठी व्यायाम हाही एक चांगला पर्याय आहे.
भरपूर झोप घ्या
चांगल्या झोपेमुळे तणाव कमी होतो आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. कमी झोप घेतल्याने टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे दाढी वाढते. अशावेळी कोणतेही बाह्य उपाय केल्याशिवाय जाड दाढी करून चालणार नाही त्यासाठी 8 तासांची झोप घ्या.
आहाराकडे लक्ष द्या
तुमची दाढी जलद वाढवण्यासाठी जीवनसत्त्वे आणि पूरक आहार घ्या. दाढीची नीट वाढ होण्यासाठी आहारात जीवनसत्त्वे बी, बी1, बी6 आणि बी12 असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून घ्या. तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांसह प्रथिनांचे प्रमाण वाढवा. यामुळे जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढता येते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक खनिज आणि जीवनसत्व आहारांत असते. प्रथिनांची कमी भरून काढण्यासाठी अंडी, काजू, पालक, सोयाबीन, कडधान्ये, ब्रोकोली इत्यादी खाऊ शकता. आपले केसही प्रोटीन फायबर आहेत. त्यामुळे प्रथिनेयुक्त अन्नामुळे दाढी वाढण्यास मदत होते.
एरंडेल तेल
महागडी उत्पादने वापरण्याऐवजी रोज रात्री दाढीच्या भागावर एरंडेल तेलाची मालिश करा. याने दाढीचे केस चांगले वाढतात. एरंडेल तेलामध्ये रिसिनिक ऍसिड असते. जे तुमचे रक्त परिसंचरण वाढवते आणि त्यामुळे तुमच्या दाढीचे गळणारे केसही सहज थांबतात.
कांद्याचा रस
कांद्याचा रस तुम्हाला दाढी वाढवण्यास मदत करू शकतो. तुम्ही घरीच कांद्याचा रस काढून त्यात एरंडेल तेल किंवा पाण्याचे 2 ते 3 थेंब मिसळून दाढी कमी असलेल्या ठिकाणी लावू शकता. किमान 1-2 तास हे दाढीवर तसंच राहू द्या आणि झोपायच्या आधी धुवून टाका. काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.