तुमच्या जोडीदाराला नैराश्य आलंय? कशी मदत करावी, जाणून घ्या

तुमच्या जोडीदाराला नैराश्य आलंय? कशी मदत करावी, जाणून घ्या
Updated on

How to Help Depressed Partner : नैराश्य(Depression) ही खूप मोठी मानसिक आजाराची समस्या (Mental Health Problem) आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नैराश्य म्हणजे काय? नैराश्य आल्यावर त्याचा सामाना कसा करावा याबाबत सध्या सगळीकडेच जागृती केली जात आहे. पण तुमच्या जवळच्या व्यक्तीला नैराश्य आल्यास काय करावे हे मात्र कोणीही सांगत नाही. जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीला नैराश्य येते तेव्हा त्या व्यक्तीसोबत त्याच्या आसपासच्या व्यक्तीही त्या नकारात्मकतेमध्ये अडकून जातात.

नैराश्य आलेल्या व्यक्तीसोबत कसे वागवे, कसे वागू नये हेच समजत नाही. विशेषत: जोडीदाराला नैराश्य (Depressed Partner) आल्यावर करावे हे बऱ्याच जणांना समजत नाही. तुमचा जोडीदार नैराश्याच्या गर्ततेमध्ये वेढलेला असताना तुम्ही काहीच मदत करू शकत नाही याचा फार त्रास होतो. तुम्ही गोंधळलेले असता, वैतागलेले असता आणि हतबल झालेले असता. तुम्ही मदतीसाठी केलेला प्रयत्न जोडीदार नकारतो किंवा त्यापेक्षा वाईट म्हणजे तो त्याकडे दुर्लक्ष करत आहे असेही तुम्हाला वाटते. तुमच्या जोडीदाराच्या नैराश्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात असेही तुम्हाला वाटू शकते. नैराश्य हा एक असा आजार आहे जो नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करू शकतो आणि प्रियजनांना असहाय्य किंवा हतबल बनवू शकतो. How to Help your Husband or Wife Deal with Depression

तुमच्या जोडीदाराला नैराश्य आलंय? कशी मदत करावी, जाणून घ्या
पोपटी पार्टी घरी कशी कराल? 'या' टिप्स फॉलो करा|Popti Party At Home

गंभीर नैराश्याच्या स्वभावाचे वर्णन अनेकदा उदास, निराश, खचल्यासारखे किंवा काहीच करावेसे वाटत नाही, परंतु त्यात सतत राग देखील समाविष्ट असू शकतो. रागावणे आणि इतरांना दोष देणे सामान्य आहे. नैराश्यग्रस्त लोकांमध्ये लोकांपासून दूर राहणे आणि कशातच स्वारस्य नसणे किंवा आनंदाचा अभाव सामान्य आहे. कौटुंबिक सदस्यांनी लक्षात येते की, निराश लोक आता आनंद शोधण्याची काळजी करत नाहीत.

यासर्वामुळे उदास जोडीदाराला कशी मदत करावी हे जाणून घेणे कठीण होऊ शकते. पण तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नैराश्य दूर करू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या जोडीदाराला बरे होण्याच्या मार्गावर मदत करू शकता.

नैराश्याबद्दल जाणून घ्या

गंभीर नैराश्य आजारांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किमान दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये एकतर उदासीन मनस्थिती, स्वारस्य नसणे किंवा आनंद कमी होणे. नैराश्य हा एक स्थिर आजार नाही. नैराश्याने ग्रस्त लोकांचे दिवस खूप चांगले असू शकतात, अगदी सलग काही चांगले दिवसही चांगले असतात पण पुन्हा एकदा गंभीर उदासीन मनःस्थितीमध्ये ते जाऊ यसकतात. ते नेहमीच नैराश्य स्थितीमध्ये नसतात.

नैराश्यामध्ये खालील लक्षणे असू शकतात:

  • दुःख, निराशा, रडू येण्याची भावना,

  • भूकमध्ये बदल (वजन वाढणे किंवा कमी होणे यासह)

  • झोपेचा त्रास (खूप झोपणे किंवा खूप कमी झोपणे)

  • नेहमीच्या सामान्य गोष्टीतील स्वारस्य किंवा आनंद कमी होणे

  • थकवा (अगदी छोट्या कामांनाही जास्त वेळ लागेल)

  • चिंतेत किंवा वैतागलेले असणे

  • क्रोधाचा उद्रेक होतो

  • निरुपयोगीपणा किंवा अपराधीपणाची भावना (भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून)

  • विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी समस्या येऊ शकते

  • आत्महत्येच्या विचारांसह मृत्यूचे वारंवार विचार

तुमच्या जोडीदाराला नैराश्य आलंय? कशी मदत करावी, जाणून घ्या
महिलांनो, योनीतून दुर्गंधी येतेय,अशी घ्याल काळजी Vaginal Health

अस्पष्ट शारीरिक लक्षणे (Unexplained physical symptoms)

तुमच्या जोडीदाराला मदत करण्यासाठी महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे आजार समजून घेणे. नैराश्याची लक्षणे बदलू शकतात आणि कालांतराने बदलू शकतात. तुम्ही नैराश्याबद्दल नक्कीच वाचू शकता आणि अधिक माहितीसाठी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता, परंतु तुमच्या जोडीदाराला नैराश्याचा कसा अनुभव येतो हे समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खुले प्रश्न विचारणे आणि सहानुभूतीपूर्वक ऐकणे.

सोबत राहा (Be there)

तुम्हाला कदाचित असे वाटेल की सर्वोत्तम उपलब्ध उपचार शोधणे, सपोर्ट गृप शोधणे किंवा नैराश्याशी झुंज देत असलेल्या इतर लोकांशी बोलणे हे मदत करू शकेल पण प अनेकदा तुम्ही तुमच्यासाठी जोडीदारासाठी सर्वोत्तम गोष्ट करू शकता ती म्हणजे त्याच्यासोबत राहा. तुमच्याकडे सर्व उत्तरे नाहीत आणि ते ठीक आहे, पण तुम्ही काय करू शकता ? तर तुम्ही जोडीदारासोबत बसून फक्त ऐका. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा हात धरू शकता, त्याला मिठी देऊ शकता आणि सोबत राहू शकता. तुम्ही सकारात्माक उत्तरांसह त्याला प्रतिसाद देऊ शकता.

उदाहरणार्थ

  • "मला सांग, मी काय तुला मदत करू शकतो."

  • "तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस."

  • "मी नेहमी तुझ्यासोबत आहे."

  • "आपण यातून एकत्र मार्ग काढू."

  • उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करा Encourage treatment

नैराश्याने ग्रस्त असलेल्या बर्‍याच लोकांसाठी, लक्षणे इतकी गंभीर असतात की काम, शाळा, सोशल अॅक्टिव्हिटी किंवा नातेसंबंध यासारख्या दैनंदिन गोष्टींमध्ये लक्षणीय समस्या निर्माण होतात. इतर लोक ते उदासीन आहेत हे ओळखू शकत नाहीत. त्यांना नैराश्याची लक्षणे समजू शकत नाहीत आणि त्यांना वाटते की त्यांच्या भावना त्यांनाच सहन कराव्या लागतील. बर्‍याचदा, लोकांना असे वाटते की त्यांना फक्त स्वतःला बरे करायचे आहे, परंतु नैराश्य क्वचितच उपचाराशिवाय सुधारते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला उपचारांसाठी प्रोत्साहन द्या आणि काउन्सिलरच्या भेटीदरम्यान तिथे राहून मदत करू शकता.

तुमच्या जोडीदाराला नैराश्य आलंय? कशी मदत करावी, जाणून घ्या
लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष

तुमच्या जोडीदाराला पुढील गोष्टी करून उपचार घेण्यास मदत करा:

तुमच्या लक्षात आलेली लक्षणे शेअर करा

तुमची चिंता व्यक्त करा.

तुमची इच्छा व्यक्त करा, काऊन्सिलरच्या भेटीसाठी आणि तयारी करण्यासाठी मदत करा

नैराश्याबद्दल तुम्ही काय शिकलात यावर चर्चा करा.

मानसोपचार, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदलांसह उपचाराच्या पर्यायांबद्दल बोला.

घरामध्ये पोषक वातावरण तयार करा

हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुमच्या जोडीदाराचे नैराश्य ही कोणाचीही चूक नाही. तुम्ही त्याचे निराकरण करू शकत नसले तरी, तुमचा पाठिंबा तुमच्या जोडीदाराला या कठीण काळात काम करण्यास मदत करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()