सध्याच्या घडीला मुलांचे लैंगिक शोषण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपल्या पाल्याचे शाळेत लैंगिक शोषण तर होत नाही ना? याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आपली मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांना काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या मुलांसोबत शाळेत काहीतरी वाईट घडत असेल किंवा लैंगिक शोषण होत असेल, तर त्याची काही चिन्हे मुलांच्या वागण्यात दिसू लागतात. मुलांच्या वर्तनात देखील फरक दिसू लागतो. अशावेळी तुमचे मुलांकडे बारीक लक्ष असणे आवश्यक आहे.