Happy Hormones: आनंदी हार्मोन्स वाढवण्यासाठी 'या' गोष्टी केल्यास सप्लिमेंटची भासणार नाही गरज

Happy Hormones: शरीरात आनंदी हार्मोन्सच्या कमतरतेमुळे लोक अनेकदा चिडचिडपणा करतात. यामुळे आनंदी हार्मोन्स वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.
Happy Hormones
Happy HormonesSakal
Updated on

Happy Hormones: आपण सर्वजण आनंदी राहण्यासाठी काही ना काही करत असतो. काही लोकांना खरेदी करायला आवडते तर काही लोकांना फिरण्यात मजा येते, तर अनेकांना जेवण करायला आवडते. पण कधी कधी आपल्या आयुष्यात असं घडतं की आपण विनाकारण दुःखी होतो. सतत चिडचिड करत असतो. रागाच्या भरात किंवा चिडून तुमच्या इतरांचे मन दुखावतो.

खरंतर यामागचं कारण म्हणजे आनंदी हार्मोन्स कमी होणं आहे. या हार्मोन्सचे चार प्रकार आहेत. हार्मोनच्या चढउतारांमुळे अनेकदा लोक निराश आणि तणावाचे बळी ठरतात. त्यामुळे हे हार्मोन्स टिकून राहणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारच्या सप्लिमेंट्सची मदत घेऊन तुम्ही त्यांचा समतोल राखला पाहिजे असे नाही. तज्ज्ञांच्या मते आनंदी हार्मोन्स वाढवण्यासाठी तुम्ही पुढील नैसर्गिक पद्धतींचा वापर करू शकता.

हार्मोनचे प्रकार किती?

डोपामाइन हार्मोन

ऑक्सिटोसिन हार्मोन

सेरोटोनिन हार्मोन

एंडोर्फिन हार्मोन

हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी काय करावे?

तज्ञांच्या मते डोपामाइन हार्मोन वाढवण्यासाठी आपण स्वत: ची काळजी घेतली पाहिजे. तुमची आवडती गाणी ऐकावी. सकस आहार घ्यावा. तुम्हाला आवडतील असे काम करावे. छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या कराव्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसाची सुरूवात आणि झोपताना मोबाईल फोनचा वापर करू नका.

ऑक्सिटोसिन हार्मोन ज्याला आपण लव्ह हार्मोन्स म्हणून देखील ओळखतो. हे हार्मोन वाढवण्यासाठी आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवा. आवडत्या व्यक्तीला मिठीत घ्यावे. तुम्ही पाळीव प्राण्यासोबत देखील वेळ घालवू शकता.

Happy Hormones
Floral Shirt: मुलही कॅरी करू शकतात फ्लोरल प्रिंट्स, हॅडसम लुकसाठी फॉलो करा 'या' सोप्या पद्धती

सेरोटोनिन हार्मोन फील गुड हार्मोन म्हणून ओळखला जातो. ते वाढवण्यासाठी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवला पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला पाहिजे. यामुळे सकारात्मकता वाढते. तसेच नियमितपणे व्यायाम करावा आणि तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल समाधानी राहावे.

एंडोर्फिन हार्मोन पेन किलर म्हणून ओळखला जातो. तो तुमचा मेंदू शांत करतो. हे वाढवण्यासाठी हसण्याची शक्य तितकी कारणे शोधा. तुम्ही कॉमेडी चित्रपट देखील पाहू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.