CNG CAR ला चांगला मायलेज हवंय, मग या टिप्स नक्की उपयोगी पडतील

तुम्ही काही गोष्टींची दखल घेतलीत तर तुमची सीएनजी कारही CNG Car चांगलं मायलेज देऊ शकते.
CNG कारचे मायलेज
CNG कारचे मायलेजEsakal
Updated on

प्रत्येक कार चालकाला त्याच्या कारनेही चांगल मायलेड द्यावं अशी अपेक्षा असते. महामार्गांवरून प्रवास करत असताना आपल्या कारनेही इतरांना मागे टाकावं आणि कमी इंधनात मोठा पल्ला गाठावा असं प्रत्येकाला वाटतं असतं. मात्र बऱ्याचदा आपल्या काही लहान मोठ्या चुकांना मुळे किंवा दूर्लक्ष झाल्याने कारचं मायलेज कालांतराने कमी होवू लागतं. How to increase milage of your CNG Car

अर्थातच मायलेज कमी झाल्याने इंधनाचा खर्च वाढतो आणि खिशाला मोठा फटका बसतो. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत बऱ्याचदा CNG Car ही कमी खर्चिक असते. मात्र या कारमध्ये कालांतराने मायलेज कमी होण्याची शक्यता निर्माण होते. असं असलं तरी तुम्ही काही गोष्टींची दखल घेतलीत तर तुमची सीएनजी कारही CNG Car चांगलं मायलेज देऊ शकते. Increase mileage of CNG Car

हे देखिल वाचा-

CNG कारचे मायलेज
Top 5 CNG Cars : 35.60 किमी पर्यंत मायलेज देणाऱ्या या कार्स, किंमत 9 लाखांपेक्षा कमी

कारच्या क्लचची काळजी घ्यावी- अनेकदा कारच्या अधिक इंधन खेचण्यामागे कारच्या गियरबॉक्समध्ये असलेल क्लच ही कारणीभूत असू शकतं. कल्च जर योग्य परिस्थितीत नसेल तर याचा थेट परिणाम गाडीच्या मायलेजवरही पडू शकतो. यासाठीच वेळोवेळी कारच्या क्लचची तपासणी करून काळजी घेणं गरजेचं आहे.

टायरच्या प्रेशरची काळजी घेणं गरजेच- कारच्या मायलेजसाठी टायरचं प्रेशर योग्य प्रमाणात असणं जास्त गरजेचं आहे. टायरमध्ये कमी प्रेशर असताना कार चालवल्यास अनेकदा रस्ता आणि टायरचं रबर यामध्ये जास्त घर्षण निर्माण होतं. याचा थेट प्रभाव कारच्या इंजनवर पडतो. इंजिनवर जास्त दबाव म्हणजेच जास्त इंधनाचा वापर. यासाठीच कारच्या टायरचं प्रेशर नेहमी तपासणं गरजेचं आहे. 

एअर फिल्टर स्वच्छ ठेवणं गरजेचं- कारच्या एअर फिल्टरची काळजी घेणंही गरजेचं आहे. सीएनजी हा हवेपेक्षाही हलका असतो त्यामुळे काही वेळा हवेतील कण पॉवरट्रेनमध्ये समस्या निर्माण करू शकतात. हवा सहसपणे पार न होवू शकल्याने इंजिनवर दबाव निर्माण होण्यास सुरूवात होते. त्यामुळे चांगलं मायलेज मिळण्यासाठी एअर फिल्टर वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे. ५ हजार किलोमीटर पर्यंतची राईड झाल्यानंतर एअर फिल्टर बदलणं गरजेचं आहे. CNG car mileage tips

स्पार्क प्लग बदलावं- CNG कारचं इग्निशन तापमान हे पेट्रोल कारपेक्षा अधिक असतं. म्हणूनच CNG कारमध्ये शक्तीशाली स्पार्क प्लग वापरणं गरजेचं आहे. याशिवाय एकसारख्याच कोडचा स्पार्क प्लगचा सेट असावा याची खात्री करून घ्यावी. तसचं कारची हीट रेंजही कंपनीच्या नियमानुसारच असावी. 

गॅस लिकेज चेक करावी- जर तुमच्या CNG गॅसच्या टाकीत लिकेज असेल तर मायलेज कमी होण्याची दाट शक्यता असते.  तसचं सुरक्षेच्या दृष्टीने देखील ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सीएनजी कीटची वेळोवेळी तपासणी करा. खास करून तुम्ही अनेक दिवस एका जागी कार पार्क ठेवली नसेल आणि ती वापरली नसेल तर केव्हाही कारच्या गॅस टाकीची पूर्ण तपासणी करावी. यासाठी कारमध्ये गॅस डिटेक्टर इंस्टॉल करणं कधीही फायदेशीर ठरू शकतं. 

CNG किट ओरिजनल असावं- अनेक ऑटोमोबाईल कंपन्या त्यांचे CNG कारचे मॉडल लॉन्च करत आहेत. कंपनीकडून बसवण्यात आलेल्या सीएनजी कीटसह गाडी खरेदी करणं कधीही अधिक विश्वसनीय असतं. मात्र जर तुम्ही तुमच्या पेट्रोल कारमध्ये CNG बसवण्याचा विचार करत असाल तर ओईएम प्रमाणित डीलरकडूनच हे किट खरेदी करावं. केवळ काही पैशांची बचत करण्यासाठी नॉन- ब्रॅण्डेड किट बसवू नये. 

कारमध्य़े कमी वजन ठेवा- जर तुम्ही CNG कार वापरत असाल तर कारमध्ये जास्त वजन ठेवू नका. कारमध्ये जितकं जास्त वजन असेल तितका अधिक दबाव इंजिनवर पडू शकते. त्यामुळे कारची इंधन क्षमता कमी होवू शकते.

CNG कारला जास्त मायलेज मिळावा यासाठी या काही टिप्सचा वापर करा. तसचं CNG टँकमध्ये गॅस भरताना तो ओव्हरफील म्हणजेच जास्त भरू नये. याशिवाय एसी किंवा हिटरचा वापर करतानाही थोडी काळजी घेतल्यास गाडीच्या मायलेजवर त्याचा परिणाम होवू शकतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()