Monsoon Tips : पावसाळ्यात मसाले खराब होण्याची भीती? मग टिकवण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स

पावसाळ्याच्या हंगामात सर्वत्र थंडगार वातावरण असते. पावसाळ्यात आरोग्याबरोबरच प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते.
spices
spices sakal

पावसाळा आला की प्रत्येक गृहिणीची धाकधूक वाढते. कारण, पावसाळ्याच्या दिवसात मसाले खराब होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत, त्यांना सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण ते एकदा खराब झाले की, नंतर वापरता येत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात मसाले सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स सांगणार आहोत.

जुने मसाले फेकून द्या

अनेकदा मनात हा प्रश्न पडतो की जास्त काळ मसाले कसे स्टोर करायचे? मसाल्याच्या डब्यात जास्त वेळ मसाले ठेवल्यास ते खराब होऊ लागते. पावसाळ्यात जुने मसाले लवकर खराब होऊ लागतात. त्यामुळे सर्वात आधी जुने मसाले फेकून द्या.

मसाल्याचा डबा स्वच्छ करत राहा

पावसाळ्यात प्रत्येक गोष्टीत स्वच्छता हवी. मसाल्याचा डबा स्वच्छ करत राहा. दर आठवड्याला मसाल्याचा डबा साफ करत राहणेही महत्त्वाचे आहे. तसेच, नेहमी लक्षात ठेवा की या मसाल्यांना कधीही ओल्या हातांनी स्पर्श करू नका.

spices
Kitchen Hacks : अशा पद्धतीने स्टोर करा हिरवे मटार, वर्षभर राहतील फ्रेश आणि हेल्दी...

काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा

अनेकजण मसाले प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यात ठेवतात. परंतु पावसाळ्यात प्लास्टिक आणि स्टीलऐवजी काचेच्या भांड्यात ठेवणे चांगले.

खडे मसाले वापरा

पावसाळ्यात खडे मसाले वापरावेत. हे मसाले लवकर खराब होत नाहीत. त्याचबरोबर पावडर मसाले पावसाळ्यात लवकर खराब होतात.

Shabda kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com