Skin Care Products : रंग अन् गंध बदलल्यास लगेच फेकून द्या हे स्किन केअर प्रोडक्ट्स, नाहीतर..

प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेटसुद्धा वेळी जाणून घेणे गरजेचे ठरते. नाहीतर त्यांचे गंभीर परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतील.
Skin Care Products
Skin Care Products esakal
Updated on

Skin Care Products : हल्ली धावपळीच्या आयुष्यात अनेकांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यामुळे बरेच लोक त्वचेसाठी स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करतात. हे प्रोडक्ट्स चेहऱ्याचा ग्लो वाढवतात. मात्र या प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेटसुद्धा वेळी जाणून घेणे गरजेचे ठरते. नाहीतर त्यांचे गंभीर परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतील.

दिल्लीचे अभिवृत्त एस्थेटिक्सचे कॉस्मेटोलॉजिस्ट आणि स्किन एक्सपर्ट डॉ. जतिन मित्तल सांगतात की, बहुतांश स्किन केअर प्रोडक्ट्सच्या पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. एक्सपायरी डेटनंतर प्रोडक्टची गुणवत्ता आणि त्याचा प्रभाव दोन्ही कमी होतो.

कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट्स किती काळानंतर एक्सपायर होतात?

फेस वॉश - १-२ दोन वर्षे

मॉश्चरायझर - १-३ वर्षे

सनस्क्रीन - १-२ वर्षे

टोनर - ६ महिने -१ वर्ष

सीरम - ६ महिने- १वर्ष

एक्सफोलिएटर - ६ महिने-१ वर्ष

Skin Care Products
Skin Care Products

प्रोडक्टची पॅकेजिंग उघडल्यानंतर एवढ्या काळ टिकतं प्रोडक्ट

रेटिनॉल - या प्रोडक्टची पॅकेजिंग उघडल्यानंतर २-३ महिन्यांत हे प्रोडक्ट वापरून संपवा.

व्हिटॅमिन सी सीरम - पॅकेजिंग उघडल्यानंतर ३ महिने

बेंजोयल पेरॉक्साइड - उघडल्यानंतर ३ महिन्यांपर्यंत

Skin Care Products
Beauty Products : नेलपेंट असो वा कॉम्पॅक्ट पावडर; का घातक आहेत ब्युटी प्रोडक्ट्स ?

क्रीम-सीरम किंवा लोशनचा उपयोग कधी करू नये

डॉ. जतिम मित्तल सांगतात की, प्रोडक्टचा गंध, रंग आणि स्ट्रक्चरवर लक्ष द्यायला हवं. जर प्रोडक्टमधून नेहमीप्रमाणे गंध येत नसेल तर असे प्रोडक्ट वापरणे टाळा.

स्किन केअर प्रोडक्ट योग्य पद्धतीने कसे वापरावे?

1. स्वच्छता राखा - प्रत्येक वेळी प्रोडक्टचा वापर करण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ हाताने प्रोडक्ट्सचा वापर केला तर त्वचेला हानी पोहोचणार नाही.

२. हायनीजकडे लक्ष द्या - प्रोडक्ट्स स्वच्छ आणि कोरड्या जागेवर ठेवा. जेणेकरून त्यांच्या गुणवत्तेवर कुठलाही प्रभाव पडणार नाही. (Cosmetic Products)

Skin Care Products
Women Beauty Tips : स्किनची स्पेशल केअर करायचीय? मग या 5 गोष्टींसह वापरा ग्लिसरीन, चेहऱ्यावर दिसेल नॅचरल ग्लो

३. प्रोडक्ट्स वापरण्याआधी शेक करा - कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट वापरण्याआधी चांगल्याप्रकारे शेक करून घ्या. (Beauty)

४. योग्य प्रमाणात वापर करा - प्रत्येक प्रोडक्ट कधी आणि किती प्रमाणात लावावे हे त्या प्रोडक्टच्या लेबलवर एकदा नक्की चेक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.