मुंबई : 'अरे, आजची मुलं खूप हुशार झाली आहेत... आजच्या मुलांना काही शिकवायची गरज नाही... आजची मुलं मार खात नाहीत, म्हणूनच अशी झाली आहेत...' वगैरे अशी कितीतरी वाक्ये आपण रोज ऐकत असतो.
मूल हुशार आणि कठोर स्वभावाचं असणं आणि ते बिघडणं यात खूप मोठा फरक आहे. कधीकधी आई-वडील आपल्या मुलांना बिघडवण्यास जबाबदार असतात. पण अनेक वेळा त्यांना स्वतःलाही समजत नाही की त्यांचे मूल बिघडत आहे.
काही लक्षणे मुलांच्या वर्तणुकीत दिसत असल्यास पालकांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे. हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
१. हट्टीपणा
कुठेतरी बाहेर जाताना मूल खूप रडते, काहीतरी विकत घ्यायचा हट्ट करते. मुलाची इच्छा पूर्ण झाली नाही तर ते हैदोस घालते. अशा वेळी समजावे की मूल हट्टी झाले आहे.
मुलांना नकार ऐकण्याची सवय लावायला हवी. प्रत्येक गोष्ट ऐकली जात असेल तर नकाराची सवय राहात नाही. यामुळे मुलांना भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागते कारण वास्तविक जीवनात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईलच असे नाही.
२. इतरांच्या गोष्टी पाहून आपल्या गोष्टींना कमी लेखणे
प्रत्येक पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. पण एखादी गोष्ट मिळाल्यावरही तुमच्या मुलाचे समाधान होत नाही. त्याच्याकडे जे आहे त्यात तो आनंदी राहात नाही. इतरांकडे असलेल्या वस्तू जशाच्या तशा त्याला हव्याच असतात.
३. तुम्हाला उलट उत्तर देणे आणि नकार देणे
मुलांना त्यांच्या पालकांचे ऐकण्याची सवय असावी. जर मूल तुमचे ऐकत नसेल आणि फक्त स्वतःच्या इच्छेनुसार वागत असेल तर ते चांगले नाही.
अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे दिसून येते. उदाहरणार्थ, जर तुम्ही मुलाला आईस्क्रीम खाण्यास मनाई केली असेल तरीही तो गुपचूप खात असेल तर ते चुकीचे आहे. मुलाला काही प्रमाणात गोष्टी स्वीकारायला शिकवा.
४. इतरांच्या भावनांची पर्वा न करणे
इतरांच्या भावनांची पर्वा न करता स्वत:ला हवे तेच करत राहाण्याची वाईट सवय मुलांना असते. आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही ना हे समजून घ्यायला मुलांना शिकवा.
५. हार सहन करू शकत नाही
मुलं अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतात, पण हरले तर रडणं किंवा हैदोस घालणं योग्य नाही. जीवनात जय-पराजय असतो हे मुलांनी समजून घेतले पाहिजे.
त्याला आपल्या पराभवाचे वाईट वाटणे अगदी योग्य आहे. पण त्यासाठी त्याने आक्रमक होणे योग्य नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.