Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज पोहे, उपमा, शिरा, इडली खाऊन बोअर व्हायला होते. त्यामुळे, नाश्त्याला काहीतरी वेगळे करून खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. जर तुम्हाला असा वेगळा आणि चवदार नाश्ता हवा असेल तर तुम्ही नाश्त्याला बेसन पोहे कटलेट बनवू शकता.
बेसन पोहे कटलेट बनवायला अतिशय सोपे आहेत. खायला चवदार आणि खुसखुशीत लागणारे हे कटलेट सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे कटलेट्स बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात बेसन पोहे कटलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.
पोहे ३ वाटी
बेसन १ वाटी
रवा १ कप
बारीक चिरलेला कांदा १
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
लाल तिखट १ चमचा
अर्धा चमचा हळद
जिरे पावडर १ चमचा
चाट मसाला १ चमचा
तेल आवश्यकतेनुसार
चवीनुसार मीठ
बेसन पोहे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे ५ ते ७ मिनिटे पाण्यात भिजवा.
तोपर्यत बेसन कोरडे भाजून घ्या. या बेसनामध्ये रवा, हिरवी मिरची, जिरेपूड, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि मीठ घाला.
आता भाजलेले बेसन थंड झाल्यावर पोह्यात घालून चांगले मळून घ्या.
त्यानंतर, तळहाताला थोडे तेल लावून पोह्यांच्या मिश्रणापासून कटलेट तयार करा. तुम्हाला हवा तसा आकार द्या.
आता कढईत तेल गरम करून पोहे कटलेट मंद आचेवर तळून घ्या.
सोनेरी रंग येईपर्यंत कटलेट दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्या.
आता तुमचे बेसन पोहे कटलेट तयार आहेत. हिरवी पुदिना चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.