Fresh Lime Soda : दिवसभर फ्रेश राहण्यासाठी घरच्या घरी बनवा लिंबू सोडा, कडक उन्हात मिळेल थंडावा, सोपी आहे रेसिपी

Fresh Lime Soda : उन्हाळ्याला तुम्हाला जर दिवसभर ताजेतवाने आणि एनर्जेटिक रहायचे असेल तर त्यासाठी फ्रेश लाईम सोडा उत्तम पर्याय आहे.
Fresh Lime Soda
Fresh Lime Sodaesakal
Updated on

Fresh Lime Soda : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या कडक उन्हात बाहेर पडल्यानंतर आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. या उकाड्यामुळे अनेक जण हैराण होतात. मग, शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेक जण थंड पेय किंवा थंड खाद्यपदार्थ खाण्यावर भर देतात.

या दिवसांमध्ये खास करून फ्रेश लिंबू सोडा, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे इत्यादी अनेक पेय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शिवाय, लोकांना ही पेय प्यायला आवडतात. परंतु, तुम्हाला जर दिवसभर ताजेतवाने आणि एनर्जेटिक रहायचे असेल तर त्यासाठी फ्रेश लाईम सोडा बेस्ट आहे. केवळ १ ग्लास फ्रेश लाईम सोडा प्यायल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल, यात काही शंका नाही.

फ्रेश लाईम सोडा हे अतिशय ताजेतवाने पेय आहे. शिवाय, हा फ्रेश लाईम सोडा बनवायला ही अतिशय सोपा आहे. तुम्ही घरच्या घरी कधीही हा फ्रेश लाईम सोडा तयार करून पिऊ शकता.

फक्त १० मिनिटांमध्ये हा सोडा बनवला जाऊ शकतो. सामान्य लिंबूपाण्यापेक्षा हा फ्रेश लाईम सोडा चवीला अतिशय वेगळा लागतो. घरच्या घरी फ्रेश लाईम सोडा कसा बनवायचा? ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात याची सोपी रेसिपी.

Fresh Lime Soda
Rose Lassi Recipe : घरच्या घरी बनवा रोझ लस्सी, कडक उन्हाळ्यात मिळेल थंडावा! सोपी आहे रेसिपी

फ्रेश लाईम सोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • अर्धा कप लिंबाचा रस

  • ३ कप सोडा

  • अर्धा कप साखर किंवा पीठीसाखर

  • १ कप क्रश केलेला बर्फ (तुमच्या आवश्यकतेनुसार)

  • चवीनुसार मीठ

  • सजावटीसाठी पुदिन्याची पाने

फ्रेश लाईम सोडा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • फ्रेश लाईम सोडा बनवण्यासाठी सर्वात आधी लिंबाचा रस, सोडा, मीठ आणि साखर एकत्र करा.

  • जोपर्यंत यातील साखर पूर्णपणे विरघळत नाही, तोपर्यंत हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • हे मिश्रण एकजीव केल्यानंतर एका ग्लासात बर्फाचे काही तुकडे मिसळा.

  • यावर आता हे लिंबू-सोड्याचे मिश्रण घाला.

  • त्यानंतर, पुदिन्याच्या पानांचा वापर करून छान सजावट करा.

  • तुमचा थंडगार फ्रेश लाईम सोडा आता तयार आहे.

Fresh Lime Soda
Carrot Chia Pudding Recipe : गोडही अन् हेल्दीही! आहारात करा या पुडिंगचा समावेश, कोलेस्ट्रॉलसोबतच बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.