नव्या ठिकाणी अनोळखी लोकांशी मैत्री कशी कराल? ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

अनेकजण सहजपणे काही लोकांशी मैत्री करतात किंवा जुळवून घेतात. मात्र...
friends growth physical personality
friends growth physical personality
Updated on

आपल्या सर्वांच्या आयुष्यात मित्रांना एक अढळ स्थान असते. मित्र म्हणजे मनातील एक हाळवा कोपरा असतो. ज्याल प्रत्येक गोष्ट माहित असते आणि जो आयुष्यातील एक महत्वाचा घटक असतो. जीवनाच्या प्रत्येक नव्या पातळीवर आपण अनेक मित्र मिळवतो. मात्र अनेकवेळा कामाच्या किंवा अभ्यासाच्या निमित्ताने आपल्याला आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात जावे लागते. अशावेळी नव्या ठिकाणी, नव्या शहरात मित्रांची कमतरता जाणवते. अनेकजण सहजपणे काही लोकांशी मैत्री करतात किंवा जुळवून घेतात. मात्र काही लोकांना नवीन ठिकाणी मैत्री करणे कठीण जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही युक्ती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही नवीन ठिकाणी सहजपणे मित्र बनवू शकाल.

तुम्ही नव्या ठिकाणी असता, तेव्हा तुमची लोकांशी ओळख नसते. हे लोक तुम्हाला परिचित नसतात. अशावेळी अनोळखी लोकांशी बोलताना किंवा त्यांना समोरे जाताना चेहऱ्यावर हसू ठेवा. एखाद्या नवीन कॉलेजमध्ये गेला तर तिथे इतरांना तुमची ओळख करून द्या. यामुळे तेथील लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. अनोळखी लोकांशी तुम्ही ओळख वाढवली तरच ते लोक स्वतःहून तुमच्याशी बोलतील अन्यथा तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो.

friends growth physical personality
Maharashtra Rain : ऐन सणात पावसाचा खोळंबा; राज्यात 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

तुम्हाला इतरांशी मैत्री करायची असेल तर आधी त्यांच्या काही गोष्टी ऐकण्याची सवय लावून घ्या. अशावेळी तुम्ही फक्त स्वत:बद्दल बोलत राहिलात तर त्यांनाही तुमच्याशी जास्त बोलायला आवडणार नाही. तुम्ही इतरांचे ऐकता तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती असते. अशा प्रकारे तुमचे लोकांशी संभाषण वाढेल आणि तुम्ही मित्र बनवू शकाल.

आपल्या मित्रांसोबत काहीवेळा आपण असे काही संभाषण करतो ते गमतीत असते मात्र इतरांना ते ऐकायला नको वाटते. त्यामुळे नवीन लोकांमध्ये असता तेव्हा अशी भाषा किंवा शब्द वापरू नका. यामुळे तुमचे इंप्रेशन बॅड होऊ शकते. असे संभाषणामुळे कदाचित तुमच्या मित्रांना वाईट वाटणार नाही परंतु तुम्ही अनोळखी लोकांमध्ये असल्यास त्याचे वाईट पडसाद उमटू शकतात. त्यामुळे मित्रांसोबत कम्फर्ट झोन नसाल तेव्हा अशी भाषा वापरणे टाळा.

friends growth physical personality
डेबिट, क्रेडिट कार्डचे व्यवहार आणखी सुरक्षित होणार; पुढील महिन्यापासून नियमात बदल

अनेक वेळा चेष्टेत आपण असे काही बोलतो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ वाटायला लागते. परंतु नवीन ठिकाणी तुम्हाला काही लोकांशी मैत्री करायची असेल तर तुम्ही असे बोलणे टाळले पाहिजे. काहीवेळा ओळख वाढवण्यासाठी तुम्ही एखाद्याची चेष्टा करायला सुरुवात केली, तर लोकांना तुमच्याशी बोलणे आवडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.