Natural Colours for Holi 2024 : यंदा होळीला घरच्या घरी तयार करा फुलांपासून आकर्षक रंग, जाणून घ्या पद्धत

Natural Colours for Holi 2024 : मार्केटमध्ये मिळणारे विविध रंग हे केमिकलयुक्त असतात. त्यामुळे, या रंगांचा वापर केल्याने त्वचेला आणि केसांना हानी पोहचण्याचा धोका असतो.
Natural Colours for Holi 2024
Natural Colours for Holi 2024 esakal
Updated on

Natural Colours for Holi 2024 : भारतात होळीचा सण (Holi 2024) हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या निमित्ताने होलिका दहन केले जाते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात आणि एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. गुलाल आणि विविध रंगांशिवाय हा होळीचा सण अपूर्ण आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

परंतु, मार्केटमध्ये मिळणारे विविध रंग हे केमिकलयुक्त असतात. त्यामुळे, या रंगांचा वापर केल्याने त्वचेला आणि केसांना हानी पोहचण्याचा धोका असतो. या रंगांमुळे त्वचेवर रॅशेल, लाल पुरळ किंवा खाज येऊ शकते. यासोबतच केसांच्या ही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, होळीला नैसर्गिक रंगांचा वापर करणे फायद्याचे आहे.

नैसर्गिक रंग हे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील सुरक्षित आहे. जर यंदा तुम्हाला पर्यावरणपूरक होळी खेळायची असेल तर तुम्ही घरच्या घरी विविध फुलांचा वापर करून नैसर्गिक रंग बनवू शकता. या नैसर्गिक रंगांमुळे डोळे, नाक, कान, घसा यांना कोणतीही इजा होणार नाही. हे रंग घरच्या घरी कसे बनवायचे? चला तर मग जाणून घेऊयात.

Natural Colours for Holi 2024
Holi 2024 : यंदा होळी दणक्यात साजरी करायचीय? मग, भारतातील 'या' शहरांमध्ये जायलाच लागतंय

झेंडुचे फूल

झेंडुची पिवळी फुले किंवा झेंडुच्या लाल फुलांपासून तुम्ही पिवळा गडद आणि लालसर गडद रंग बनवू शकता. हे दोन्ही रंग बनवण्यासाठी सर्वात आधी ही फुले उन्हामध्ये वाळवा. त्यानंतर, उखळीमध्ये किंवा मिक्सरला ते बारीक करून घ्या. त्याची पावडर करून घ्या. या पावडरमध्ये पाणी मिसळून यापासून पिवळा गडद किंवा लालसर रंग तयार करा. (Marigold Flower)

जास्वंदाचे फूल आणि गुलाबाचे फूल

लाल रंग हा प्रेमाचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे, होळीमध्ये हा रंग सर्वाधिक वापरला जातो. होळीच्या दिवशी या लाल रंगाचा तिलक लावण्याची जुनी परंपरा आहे. बाजारात तुम्हाला लाल रंग सहजपणे मिळू शकतो. परंतु, जास्वंदाच्या फुलांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक लाल रंग बनवू शकता.

यासाठी जास्वंदाची फुले किंवा लाल गुलाबाची फुले तुम्ही उन्हात वाळवून ती मिक्सरला बारीक करून त्यापासून पावडर बनवू शकता. यामध्ये हवे असल्यास तुम्ही चंदनाचे तेल मिसळू शकता. त्यानंतर, ही पावडर भिजवून यापासून लाल रंग बनवू शकता. (hibiscus and rose)

कडुलिंबापासून बनवा हिरवा रंग

हिरवा रंग हा उत्साहाचे आणि समृद्धीचे प्रतिक मानला जातो. शिवाय, हा कलर फ्रेश देखील आहे, त्यामुळे, अनेक जण होळीला हा रंग आवर्जून लावतात. तुम्ही घरच्या घरी हिरवा रंग बनवू शकता. हा रंग बनवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता.

सर्वात आधी कडुलिंबाची पाने तोडून ती वाळवा. आता त्यात चंदन घालून ही पाने बारीक करा. आता या पावडरमध्ये पाणी मिसळून तुम्ही नैसर्गिक हिरवा रंग बनवू शकता. (Neem)

Natural Colours for Holi 2024
Holi 2024 : होळीचा सण लय भारी! यंदाच्या वर्षी होळीवर आहे चंद्र ग्रहणाचे सावट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.