Christmas 2023 : जगभरात दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. या ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी सर्वजण आतुर असतात. ख्रिसमस म्हटलं की ख्रिसमस ट्री, त्याचे डेकोरेशन आणि विविध खाद्यपदार्थांची मेजवानी ही आलीच. ख्रिसमसला खास करून विविध फ्लेवर्सचे केक्स बनवले जातात.
यंदा ख्रिसमसला घरच्या घरी केक बनवायचा जर तुम्ही विचार करत असाल तर रेल वेलवेट केक एकदम बेस्ट ऑप्शन आहे. या केकची रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. शिवाय, हा केक बनवायला खूप साहित्याची गरज पडणार नाही.
मोजक्यात साहित्यामध्ये हा रेड वेलवेट केक तुम्ही बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी हा रेड वेलवेट केक बनवण्याची सोपी आणि सिंपल रेसिपी.
दूध अर्धी वाटी
मैदा १०० ग्रॅम
व्हिनेगर अर्धा चमचा
बटर
व्हॅनिला इसेन्स
पीठी साखर – १०० ग्रॅम
२ अंडी
कोको पावडर
बेकिंग पावडर
हेव्ही क्रीम १००
फूड कलर (लाल)
मीठ
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात बटर घाला. आता त्यात साखर घालून चांगले फेटून घ्या.
आता त्यात अंडी मिक्स करा. थोडसं तेल मिसळळं तरी चालेल.
आता या मिश्रणात दूध आणि व्हिनेगार घालून या मिश्रणाची क्रीम होईपर्यंत मिक्सरला चांगले बारीक करून घ्या.
आता दुसऱ्या एका भांड्यात मैदा चाळून घ्या. त्यात आता कोको पावडर आणि बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या.
आता हे मैद्याचे मिश्रण दूध-अंडीच्या आधीच्या मिश्रणात घालून चांगले मिसळा. यानंतर त्यात लाल रंगाचा फूड कलर घाला.
आता कुकरमध्ये मीठ घाला आणि कुकर गरम होईपर्यंत मंद आचेवर ठेवा.
आता केकचे भांडे घ्या, त्याला चांगले बटर किंवा तूप लावून घ्या. आता त्यामध्ये केकचे हे बॅटर घाला.
हे केकचे भांडे आता कुकरला लावा. ४०-४५ मिनिटांपर्यंत हा केक शिजू द्या.
तोपर्यंत एका भांड्यात शिल्लक राहिलेले बटर आणि पिठीसाखर एकत्र करा. हे मिश्रण मिक्सरला बारीक करा आणि त्यात हेव्ही क्रीम घाला.
कुकरला केक शिजल्यानंतर गॅस बंद करा.
आता केक थंड झाल्यावर त्यावर या बनवलेल्या क्रीमने तुमच्या आवडीप्रमाणे छान लेअर्स करून घ्या.
तुमचा रेड वेलवेट केक तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.