डॉ. समीरा गुजर-जोशी
मैत्रिणी, अगं, कालपरवा मी अनारसे करायचे ठरवले. लागलीच जाऊन यूट्यूबवर रेसिपी सर्च केली. बापरे! इतक्या रेसिपीज आल्या!! जाळीदार अनारसे करण्यासाठी अचूक प्रमाण सविस्तर कृती, अनारसे का बिघडतात, अनारसे तेलात विरघळू नये म्हणून विशेष टीप, तांदूळ भिजत न घालता अनारसे; कोणी म्हणे, ‘अनारसे असे करा अजिबात बिघडणार नाही’, कोणी म्हणे, ‘ही कृती परफेक्ट आहे तांदूळ भिजवण्यापासून तळण्यापर्यंत’... आता हे सगळं बघितल्याशिवाय कसं ठरवणार? हे सगळं पाहिलं, तर ‘फक्त पंधरा मिनिटांत बनवा अनारसे’ हे दिसलं... आता ही काय जादू? म्हणून तेही बघणं भाग होतं.