White Sauce Recipe : पास्त्याची चव वाढवणारा व्हाईट सॉस घरच्या घरी बनवा, जाणून घ्या 'ही' सोपी रेसिपी

White Sauce Recipe : आजकाल पास्ता हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा झाला आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक जण पास्ता खातात.
White Sauce Recipe
White Sauce Recipeesakal
Updated on

White Sauce Recipe : आजकाल पास्ता हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा झाला आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक जण पास्ता खातात. आजकाल विविध प्रकारचे पास्ता बनवले जातात. बरं हे वेगळ्या प्रकारचे पास्ता बनवण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. या वेगळ्या पास्त्यापैकीच एक असलेला पास्ता म्हणजे व्हाईट सॉस पास्ता होय.

हा व्हाईट सॉस पास्ता बनवताना, खास काळजी घ्यावी लागते. कारण, हा पास्ता बनवताना व्हाईट सॉस अतिशय चांगल्या पद्धतीने बनवणे, महत्वाचे असते. हा सॉस जर परफेक्ट नाही झाला तर मग तुमच्या व्हाईट सॉस पास्त्याची चव बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला हा व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी कसा बनवायचा? आणि त्याची सोपी रेसिपी काय आहे? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

White Sauce Recipe
Sweet Potato Cutlets : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा टेस्टी आणि हेल्दी रताळ्याचे कटलेट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ मोठे चमचे दही

  • १ कप दूध

  • १ मोठा चमचा पारमेसन चीज

  • १ मोठा चमचा मैदा

  • चवीनुसार मीठ

  • ४ चमचे काळी मिरी पावडर

  • चिमूटभर नटमेग पावडर

व्हाईट सॉस बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एक सॉस पॅन घ्या. ते मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.

  • आता सॉस पॅन गरम झाला की, त्यात बटर घाला.

  • आता या बटरमध्ये दही घाला. मात्र, हे दही पॅनला करपणार नाही, याची खास काळजी घ्या.

  • दही बऱ्यापैकी मिक्स झाल्यानंतर त्यात आता मैदा मिसळा.

  • आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळत रहा. जोपर्यंत हे चांगल्या पद्धतीने शिजत नाही, तोपर्यंत चांगले शिजवा.

  • जोपर्यंत या मिश्रणाचा छान सुगंध येत नाही, तोपर्यंत हे मिश्रण शिजवा.

  • आता मिश्रणात दूध घाला आणि मंद आचेवर हे मिश्रण पुन्हा ढवळा. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत हे मिश्रण ढवळत रहा.

  • आता या मिश्रणात काळी मिरी पावडर, चिमूटभर नटमेग पावडर आणि मीठ घालून ५ मिनिटे शिजवा.

  • ५ मिनिटांनंतर या मिश्रणात पारमेसन चीज घाला आणि पुन्हा ५-१० मिनिटे शिजवा. आता तुमचा व्हाईट सॉस तयार आहे.

White Sauce Recipe
Sweet Corn Paratha : हिवाळ्यात झटपट बनवा टेस्टी कॉर्न पराठा, जाणून घ्या सोपी रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.