महिला अनेकदा डोळे सुंदर दिसण्यासाठी काजळ वापरतात. मात्र पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे काही वेळा काजळ फार लवकर पसरते. त्यामुळे सगळा मेकअप तर बिघडतोच पण चेहराही विचित्र दिसू लागतो. अशा परिस्थितीत मेकअप करताना काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही काजळ पसरण्यापासून रोखू शकता. तसे, काजळ डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासोबतच चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढवण्याचे काम करते. मात्र, काही वेळा काजळ जास्त वेळ डोळ्यांवर राहत नाही आणि पसरूही लागते. चला तर मग आम्ही तुम्हाला काही सोप्या मेकअप टिप्स सांगतो.
काजळ लावताना किंवा लावल्यानंतर लगेच पसरत असेल तर, डोळ्यांखाली कंसीलर लावा. असे केल्याने काजळ पसरणार नाही.
जर तुमच्याकडे कंसीलर नसेल, तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही लूज पावडरचा वापर करू शकता. आपल्याला फक्त डोळ्यांखाली पावडर लावून ब्लेंड करायचे आहे. त्यानंतर डोळ्यांवर बारकाईने काजळ लावायचे आहे.
जाडसर काजळ लावयचे असेल तर, स्मज-फ्री काजळ पेन्सिलचा वापर करा. काजळच्या क्वालिटीवर देखील सौंदर्य अवलंबून असते. नेहमी चांगल्या कंपनीच्या काजळचा वापर करा. यामुळे डोळ्यांना इजा होणार नाही.
तेलकट त्वचा हे काजळ पसरण्याचे मुख्य कारण आहे. तेलकट त्वचेमुळे काजळ आय-लिड्सवर पसरते. काजळ पसरू नये म्हणून थंड पाण्याने डोळे आणि पापण्या पुसा. त्यानंतर कोरडे होऊ द्या. असे केल्याने, आपल्या डोळ्याभोवती तेलकटपणा राहणार नाही, व काजळ देखील पसरणार नाही.