उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही; या सोप्या टिप्स फॉलो करा

ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही आपण सहसा मेकअप किट वापरतो मात्र अनेकदा उष्णतेमुळे आपला मेकअप जास्त काळ टिकत नाही.
Skin care
Skin caresakal
Updated on

आशा हरिहरन

सध्या देशासह राज्यभरात उन्हाळा चांगलाच तापलाय. या रखरखीत उन्हात प्रत्येकजण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. याशिवाय उन्हाळ्यात अनेक लग्नसमारंभ किंवा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे प्रत्येकजण आपला ग्लॅमरस लूक जपण्याचा प्रयत्न करतो.

ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही आपण सहसा मेकअप किट वापरतो मात्र अनेकदा उष्णतेमुळे आपला मेक अप जास्त काळ टिकत नाही. मात्र काही योग्य मेकअपच्या टिप्स घेत आपण भर उन्हाळ्यात ताजे-तवाने आणि घामही न येणारा लूक मिळवू शकतो. (How to make your makeup last longer, check some tips here)

Skin care
High Heels आवडतात? मग ट्राय करा या टिप्स

१. सीजननुसार तुमची स्किनकेअर प्रसाधने बदलण्याची गरज असते. कारण सीजननुसार त्वचेच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्यानुसार मेकअप करणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तुमची त्वचा उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यावर भर देताना तुमचा मेकअप हलका आणि कमीत कमी ठेवा.

२. मेकअप जास्त करु नका जर तुम्ही कितीही मेकअप जास्त करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्वचेची स्किन केअर केली नाही तर तुमचा मेकअप गुळगुळीत किंवा जास्त काळ टिकणार नाही.

Skin care
Video: उन्हाळ्यात पाणी पिणं का गरजेचं?

३. मेकअपमुळे त्वचेवर तेल, बॅक्टेरिया आणि डेड सेल्स जमा होतात. त्यामुळे स्किनकेअर आवश्यक आहे. मेकअप करताना काही टिप्स फॉलो करा.

तुमच्या मेकअपचा बेस तयार करा

तेल-आधारित मेकअप चेहऱ्यासाठी हानिकारक असतो त्यासाठी जेल किंवा वॉटर-बेस्ड बेस वापरणे महत्त्वाचे आहे; त्यामुळे तुमच्या त्वचेला श्वास घेता येईल. यासाठी तेलमुक्त मॉइश्चरायझर आणि फाउंडेशन बेस वापरा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझरने तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ केल्याने रंगाच्या उत्पादनांना दिवसभर ताजे दिसण्यासाठी परिपूर्ण कॅनव्हास मिळेल.

सनस्क्रीन वापरा

आपण फक्त उन्हाळ्यातच त्वचेवर सनस्क्रीन वापरत असतो. मात्र सनस्क्रीन प्रत्येक ऋतूंमध्ये वापरायला हवे. तुमच्या दैनंदिन स्किनकेअर रूटीनचा भाग म्हणून, 30 किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन वापरल्यानंतर तुम्ही मेकअप लावू शकता. जर तुमच्या मेकअपमध्ये SPF असला तरीही, तुम्ही सनस्क्रीन लावावे.

Skin care
तुम्ही फोन कसा पकडता? यावरून कळतं व्यक्तिमत्त्व; कसं? जाणून घ्या..

नियमितपणे एक्सफोलिएट करा

एक्सफोलिएशनमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स(Blackheads), व्हाईटहेड्स (Whiteheads) आणि त्वचा साफ होते.

पॉवरहाऊस मेकअप प्राइमर वापरा

तुमचा मेकअप दिवसभर टिकेल याची खात्री करण्यासाठी प्राइमर्स ही पहिली कॉस्मेटिकची पायरी आहे. चेहऱ्याच्या काळजीसाठी तेल-मुक्त, पाणी-आधारित प्राइमर निवडा. प्राइमर्स हे उन्हाळ्यात नक्कीच वापरण्याचा पर्याय आहेत. प्रायमरमुळे खूप जास्त अतिरिक्त थर न वाटता मेकअप दिर्घकाळ टिकून ठेवण्यास मदत करतात.

(लेखिका या एनरिच येथील शिक्षणसंचालक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.