Work Balance Tips : ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑफिसमध्ये काम करताना बॅलन्स कसा ठेवावा ? फॉलो करा या टिप्स ?

आठवड्यातील ठराविक दिवस ऑफिस आणि इतर दिवस वर्क फ्रॉम होमचा पर्याय आता सुरू करण्यात आला आहे.
Work Balance Tips
Work Balance Tipsesakal
Updated on

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिली. अनेक कर्मचाऱ्यांना यामुळे फायदा झाला. कोरोना गेल्यानंतर ही अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा चालू ठेवली आहे.

परंतु, आठवड्यातील ठराविक दिवस ऑफिस आणि इतर दिवस वर्क फ्रॉम होमचा पर्याय आता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे, काहींची धावपळ ही होतेयं. मात्र, या सगळ्यात हा वर्क बॅलन्स योग्य प्रकारे राखणे हे अतिशय महत्वाचे आहे.

आज आम्ही तुम्हाला हा वर्क बॅलन्स योग्य रित्या राखण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

कामाचे शेड्यूल तयार करा

कामाचे शेड्यूल तयार करणे हे सर्वात महत्वाचे आहे. यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला सुरूवात कराल, तेव्हा त्याचे एक छान वेळापत्रक बनवा. त्यामुळे, दबाव कमी होऊन तुमची सर्व कामे वेळेवर होतील.

यामध्ये एक लिस्ट बनवा. कोणते काम आधी करावे लागेल ? आणि कोणते नंतर करावे लागेल ? हे या वेळापत्रकामध्ये स्पष्ट करा. कामाचे असे उत्तम व्यवस्थापन राखल्यामुळे, घर आणि ऑफिस यामध्ये तुम्ही संतुलन राखू शकाल.

Work Balance Tips
Work From Home दरम्यान या पोझिशनमध्ये लॅपटॉप ऑपरेट करणे धोकादायक, आरोग्याचं होईल वाटोळं

काम करताना ब्रेक घ्या

अनेकदा आपण काम करताना त्या कामात एवढे मग्न होतो की आपण जागेवरून उठत ही नाही. तुम्ही जर अशी चूक करत असाल तर असे अजिबात करू नका. काम करत असताना मध्ये काही मिनिटांचा ब्रेक घेत जा.

ब्रेक घेतल्याने तुमच्यावर कामाचे जास्त प्रेशर येणार नाही आणि जरा फ्रेश ही वाटेल. कामाचे योग्य प्रकारे नियोजन करायला शिका. ब्रेकमुळे तुम्हाला ऊर्जा ही मिळेल आणि फ्रेश राहण्यास मदत होईल. ही छोटीशी विश्रांती घेतल्यामुळे मेंदूला चांगली चालना ही मिळेल.

सहकाऱ्यांशी चर्चा करा

ऑफिसमध्ये काम करत असताना किंवा वर्क फ्रॉम होम करत असताना जर तुमच्यावर कामाचे प्रेशर येत असेल तर सोबतच्या सहकाऱ्यांशी चर्चा करा. जर तुम्हाला काम करत असताना काही समस्या येत असतील तर सहकारी त्यावर कसा मार्ग काढतात ? ते त्यांना विचारा. अन्यथा तुम्ही तुमच्या बॉससोबत ही चर्चा करू शकता. यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत मिळू शकेल.

वेळेपूर्वी कामाला सुरूवात करा

वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा ऑफिसला जात असाल तर नेहमी तुमच्या वेळेआधी कामावर पोहचण्याचा प्रयत्न करा. वेळेपूर्वी काम करायला सुरूवात केल्याने तुमचे काम वेळेत आणि लवकर होण्यास मदत होईल. तसेच, वेळेचे योग्य प्रकारे नियोजन ही तुम्हाला करता येईल. शिवाय, कामाला वेळेपूर्वी सुरूवात केल्यामुळे तुमची पेंडिंग कामे देखील वेळेत पूर्ण होतील.

Work Balance Tips
Work-Life Balance : आयटी कर्मचारी म्हणतायत मोठा पगार नाही, आयुष्यातील आनंद महत्त्वाचा; सर्वेक्षणात बाब उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.