Motivate Yourself: काय करायचं सुचत नसताना स्वत:ला कशी देणार प्रेरणा? 'या' टिप्स ठरतील उपयोगी

How to Motivate Yourself: बऱ्याचदा एखादी गोष्ट कशी करायची सुचत नसते, स्वत:ला प्रेरणा देणं कठीण जातं, अशावेळी स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात जाणून घ्या.
Motivate Yourself
Motivate YourselfSakal
Updated on

How to Motivate Yourself: प्रत्येकाला कोणतीही गोष्ट करायच असेल, तर प्रेरणेची, ध्येयाची गरज असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर कोणतीही गोष्ट करण्यासाठी एखादं कारण तरी महत्त्वाचं असतं.

पण बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट करताना आपण काय करतोय किंवा नक्की काय करायचं, हे सुचतच नसतं. स्वत:ला प्रेरणा देणं कठीण जातं. अशावेळी स्वत:ला कशी प्रेरणा द्यावी, यासाठी या काही टीप्स ज्या उपयोगी ठरू शकतात.

2. शांत बसून विचार करा की...

पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काही सुचत नसेल, तर थोडं शांत बसा आणि विचार करा की तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि तुम्हाला एखादी गोष्ट का करायची आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळालं, तर अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असते.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला रोज धावायला जायचं आहे, पण तुम्हाला त्यासाठी स्वत:ला प्रेरणा देता येत नाहीये, अशावेळी शांत बसून विचार करा की तुम्हाला रोज का धावायचं आहे, याचं उत्तर मिळाल्यानंतर तुम्हाला स्वत:ला प्रेरणा देणं सोपं होईल.

Motivate Yourself
Self-Care while Living Alone: एकटे राहताय, तर अशी घ्या स्वत:च्या मानसिक आरोग्याची काळजी अन् राहा आनंदी

2. स्वत:शी संवाद साधा

स्वत:ला प्रेरणा देण्यासाठी स्वत:शीच संवाद असणं महत्त्वाचं असते. स्वत:ला सांगा की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे, स्वत:शीच संवाद साधून कोणतीही गोष्ट करण्यासाठी आधी नियोजन करा. कारण आपल्या स्वत:लाच दुसऱ्या कोणाहीपेक्षा एखादी गोष्ट करणं का महत्त्वाची आहे, हे सर्वात चांगलं माहित असतं.

तसेच गरज पडल्यास कुटुंबाकडून किंवा मित्रपरिवाराकडून मदतही घ्या. त्यांना तुमचे नियोजन सांगा आणि मदत मागा. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट करताना गोंधळ होणार नाही आणि तुम्ही एकटेही पडणार नाही, त्यामुळे तुमच्यात उत्साह देखील टिकून राहिल.

Motivate Yourself
Summer Vacation Activities: उन्हाळ्याची सुटी मुलांसाठी अशी बनवू शकता मजेशीर अन् नवे अनुभव देणारी

3. घाई न करता हळुहळू पावले उचला आणि दबाव घेऊ नका

अतिघाई संकटात नेई, अशी आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे उगाचच गरज नसताना घाई टाळा. शांततेच विचार करून पावले उचला. सुरुवातीलाच मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा छोट्या-छोट्या आणि साध्या-साध्या गोष्टी करत पुढे जा. यामुळे तुमच्यावर फार दबावही येणार नाही. कोणतंही काम करण्याचा आनंदही घेता येईल.

उदाहरणार्थ, जसं रोज का धावायंच याचं उत्तर शोधलं, तसंच एकदम उठून १० किमी आपण धावू शकत नाही. सुरुवात हवंतर १ किमीपासून करा. रोजच्या सरावाने, हळुहळू अंतर वाढत नेल्याने तुमच्या आरोग्यालाही त्रास होणार नाही, तुम्हाला सवयही लागेल आणि कंटाळाही येणार नाही.

4. तुमची प्रगतीवर लक्ष राहु द्या

तुम्ही एखादी गोष्ट करताना त्यात किती प्रगती केली, याची नोंदही ठेवा. ज्यामुळे तुम्हाला स्वत:ला प्रेरणा देणं सोपं जाईल. तुम्ही जेव्हा स्वत:चीच प्रगती पाहाल, तेव्हा ते काम आणखी चांगलं करण्यासाठी प्रेरणा देणं सोपं जाईल. उदाहरणार्थ, तुम्ही धावण्याचं अंतर आणि वेग ज्याप्रकारे वाढवत नेला, याची तुमच्याकडे नोंद असेल, तर ते तुम्हाला रोज धावण्यासाठी प्रेरणा देत राहिल.

Motivate Yourself
Break Bad Habits: वाईट सवयी कशा बदलाव्यात? या 5 टीप्स करा ट्राय

5. संयम ठेवा

कोणतीही गोष्ट पूर्ण होण्यासाठी संयम ठेवावा लागेल. एखाद्या गोष्टीचा परिणाम मिळण्यासाठी तुम्ही सातत्याने आणि कोणालाही कोणताही त्रास न होऊ देता प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे संयम महत्त्वाचा असतो.

6. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा

याबरोबरच तुम्ही कोणाबरोबर वेळ घालवता, हे देखील महत्त्वाचं असतं. तुमचा सहवाग सकारात्म आणि तुम्हाला बळ देणाऱ्या लोकांचा असेल, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करताना प्रेरणाच मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.