तुमचा पार्टनर बालिशपणे वागतो का? जाणून घ्या त्या मागचं कारण

पार्टनरचं हे बालिश वागणं अनेकदा गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडला त्रासदायक ठरु शकतं.
love affairs
love affairsesakal
Updated on

प्रेमात पडल्यानंतर आपल्या जोडीदाराने आपले लाड करावेत, सतत आपल्याकडे लक्ष द्यावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. यात बऱ्याचदा आपल्या पार्टनरचं लक्ष वेधून घेण्यासाठी मुलगा किंवा मुलगी चित्रविचित्र कारनामे करत असतात. यात खासकरुन बालिशपणा हा हमखास केला जातो. एखाद्या लहान मुलांप्रमाणे वागून आपल्या जोडीदाराकडून लाड करुन घ्यायला अनेकांना आवडतं. परंतु, पार्टनरचं हे बालिश वागणं अनेकदा गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडला त्रासदायक ठरु शकतं. म्हणूनच, आपला पार्टनर बालिशपणे का वागतो.किंवा, त्यांच्या बालिशपणापासून कशी सुटका करुन घ्यावी ते पाहुयात. (how-to-recognize-an-emotionally-immature-man)

१. पार्टनर बालिशपणा का करतात?

ज्यावेळी एखादी मॅच्युअर व्यक्ती लहान मुलांप्रमाणे वागते त्यावेळी त्या स्थितीला लिटील प्रिंस किंवा पीटर पॅन सिंड्रोम असं मानसशास्त्राच्या भाषेत म्हटलं जातं. असे पार्टनर्स स्वार्थी मुलांप्रमाणे वागतात. एकतर ही मुलं भावनिकरित्या परिपक्व नसतात. किंवा, भावनिकरित्या ते पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असतात. त्यामुळे अनेकदा पार्टनरचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते लहान मुलांप्रमाणे वागतात.

love affairs
वरमाला घालताना निसटली नवरदेवाची पँट; नवरीलाही झालं हसू अनावर

२. पार्टनरच्या बालिशपणाचे साईड इफेक्ट्स कोणते?

पार्टनर बालिश असेल तर त्यांच्यासोबत वागता बोलताना अनेकदा अडचण येते. कारण, त्यांना कोणत्याही क्षणी लगेच राख येऊ शकतो आणि ते वाद घालू शकतात. तसंच अशा व्यक्ती विचार न करता पैसे खर्च करतात. चारचौघांमध्ये तुमची थट्टा करतात. त्यामुळे नात्यात वितुष्ट येण्याची शक्यता असते.

३. तुमचा पार्टनर बालिश आहे कसं ओळखाल?

लहान लहान गोष्टींवरुन रुसून बसणं, सतत कौतुक करावं अशी अपेक्षा धरणं, त्यांच्या मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे असा अट्टाहास करणं असा स्वभाव ज्या पार्टनरचा असतो ते बालिश असल्याचं म्हटलं जातं. तसंच त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी पणा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()