Skin Care : काही मिनिटांत दूर होईल ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्सची समस्या, घरच्या घरी तयार करा हा स्क्रब

काही घरगुती उपाय करून तुम्ही ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतात. अशा परिस्थितीत, तांदळाच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता.
skin care
skin caresakal

अनेकांना ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची समस्या असते. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना ही समस्या असते. हे ब्लॅकहेड्स बहुतेक वेळा नाकाजवळ येतात, जे काढणं फार कठीण असतं, बऱ्याचदा तुमची त्वचा स्वच्छ असते, पण तुमचं नाक हे ब्लॅकहेड्सने भरलेलं असतं. तर, काही घरगुती उपाय करून तुम्ही ब्लॅकहेड्सची समस्या दूर करू शकतात. अशा परिस्थितीत, तांदळाच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता.

तांदळाचा स्क्रब कसा तयार करायचा

सर्वप्रथम तांदूळ मिक्सरच्या मदतीने बारीक करून घ्या. आता या पिठात थोडे कच्चे दूध आणि गुलाबपाणी घालावे लागेल. या सर्वांची पेस्ट बनवा आणि 10 मिनिटे चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. नाकावर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागावर चांगले मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने धुवा.

यानंतर, फेस मॉइश्चरायझर वापरण्यास विसरू नका. हे फेस स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स दूर करण्याचा हा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे.

skin care
Skin Care : फ्रुट फेशियल करताय? मग चुकूनही करू नका 'या' चार चुका, त्वचा होईल खराब

ग्रीन टी

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी ग्रीन टी देखील उपयुक्त ठरते. एक चमचा ग्रीन टी पाण्यात मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

लिंबाचा रस

ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी दिवसातून तीन वेळा लिंबाचा रस लावा, यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतात. बेसन पिठात लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट देखील चेहऱ्यावर लावू शकता, त्यामुळे ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com