Kitchen Hacks: भाजी चिरताना हाताला लागलेले काळे डाग काढण्याच्या काही टिप्स

डाग हा फक्त कपड्यांना लागतो असं म्हटलं तर ते उचित ठरणार नाही.
Kitchen Hacks
Kitchen Hackssakal
Updated on

डाग हा फक्त कपड्यांना लागतो असं म्हटलं तर ते उचित ठरणार नाही. डाग हा घराच्या भिंतीला लागतो, गाडीला लागतो किंवा शरीरावरती लागतो. कोणत्याही ठिकाणी डाग लागला तर ते योग्य दिसत नाही. तसेच अनेक भाज्या चिरत असताना आपल्या हाताला काळे डाग पडतात. त्वचेसाठी ते अपायकारक ठरतात.

तुम्ही कधी निरीक्षण केले असाल तर कच्चे केळ, पपई अशा अनेक फळे किंवा भाजी कापताना हाताला काळे डाग लागतात. याला लगेच हटवता येत नाही. यासाठी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्या हात स्वच्छ होतील.

लिंबाचा वापर करा: हातावरील भाज्यांचे डाग साफ करण्यासाठी लिंबाचा वापर करू शकता. यासाठी थोडे पाणी गरम करून त्यात लिंबू पिळून घ्या. त्यानंतर या पाण्यात पाच ते सात मिनिटे हात बुडवून ठेवा. याने हातावरील भाज्यांचे डाग सहज निघून जातात.

बटाट्याची मदत घ्या : भाजी कापताना हातावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी मोठ्या आकाराचा बटाटा घेऊन त्याची साल काढावी व नंतर त्याचे दोन-तीन तुकडे करावेत. त्यानंतर बटाट्याचे हे तुकडे हातावरील डागांवर हळूवारपणे घासून घ्या. यामुळे डाग निघून जातील.

Kitchen Hacks
Talking In Sleep: तुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? या गोष्टींपासून राहा दूर, सहज कमी होईल समस्या

मीठ आणि गरम पाण्याचा वापर करा : हातावरील भाज्यांचे डाग घालवण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात दोन-तीन ग्लास पाणी गरम करा. त्यानंतर या पाण्यात दोन-तीन चमचे मीठ मिसळा. यानंतर या पाण्यात हात टाका आणि थोडा वेळ बसा. यामुळे काही मिनिटांत डागही निघून जातील.

Kitchen Hacks
Talking In Sleep: तुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? या गोष्टींपासून राहा दूर, सहज कमी होईल समस्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.