Home Hacks: प्रत्येक घरात बेडशीट वापरली जाते. हे गादीचे धुळीपासून संरक्षण तर करतेच शिवाय सुंदरताही वाढवते. अनेक लोक बेडशीट फाटल्यामुळे किंवा जुने झाले की टाकून देतात.
पण तुम्हाला माहीत आहे का की ही जुनी बेडशीट तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. तुम्ही या जुन्या बेडशीटच्या मदतीने घरातील कामासाठी अनेक गोष्टी बनवू शकता ज्याचा वापर तुमच्या स्वयंपाकघरात अनेक कामांसाठी केला जाऊ शकतो.
स्वयंपाकघरातील भांडे किंवा हात पुसण्यासाठी टॉवेल किंवा नॅपकिनचा वापर केला जातो. तुम्ही विकत न आणता घरीच जुन्या बेडशीटपासून टॉवेल आणि नॅपकीन बनवू शकता. यामुळे पैशाची बचत होईल आणि जुनी बेडशीट पुन्हा वापरता येईल.
जुन्या बेडशीटपासून रंगीत कुशन तयार करू शकता. जुन्या बेडशीट वापरण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी उशीचा योग्य आकार घेऊन कव्हर शिऊ शकता. तुम्ही बाजारातील लेस, कापडी स्टीकर किंवा स्टोन लावून सजवू शकता.
स्वयंपाकघरात काम करताना अनेक महिला एप्रन वापरतात. एप्रन घातल्याने कपड्यांना पीठ, त्लाचे डाग पड नाही. बाजारातून एप्रन विकत न आणता तुम्ही घरीच जुन्या बेडशीटपासून बनवू शकता. हे बनवायलाही खूप सोपे आहे. तुम्हाला शिलाई काम येत असेल तर घरीच बनवू शकता.
जुन्या बेडशीटचा वापर करून पायपुसनी तयार करू शकता. तुमच्याकडे दोन रंगाची बेडशीट असेल तर सुंदर डिझाइन तयार करू शकता. घरातील दाराजवळ ठेऊ शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.