तुमची मुलं rejection चा शिकार होताहेत.. पालकांनी 'या' बाबी समजून घ्याव्यात

पालक म्हणून, आपल्या मुलांना रिजेक्शनपासून वाचवणे, ही आपली जबाबदारी आहे.
parents - child relationship
parents - child relationshipsakal
Updated on

असं म्हणतात, मुलं ही देवाघरची फुले आहेत. त्यांचे बोलणे,हसणे, आणि त्यांचा खोडसाळपणा सर्वांची मने जिंकून घेतात, पण याच मुलाला समाजाने स्वीकारले नाही तर? आपले मित्र आपल्यापासून अंतर ठेवताहेत, सभोवतालचे सर्वजण आपल्याला नापसंत करतात. ही भावना जेव्हा मुलांमध्ये निर्माण होते, तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. (How to save our child from rejection)

तज्ज्ञांनुसार समाज व्यक्तीला घडवण्यात आणि ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. समाजाकडून नाकारले जाणे ही सर्वात दुःखदायक भावना असते. समाजाने लहान वयातच मुलांना स्वीकारले नाही तर त्याचा मानसिक परिणाम मुलावर होऊ शकतो.

एक पालक म्हणून, तुमच्या मुलाला समाज स्वीकारतो की नाही, हे समजून घेणे खुप आवश्यक आहे. जर पालकांनी हे वेळेत ओळखले तर मुलांना मदत करणे खूप सोपे होईल. नाकारलेल्या मुलाला कसे ओळखायचे आणि त्यापासून मुलाचे संरक्षण कसे करायचे ते येथे आहे.

समाजाने नाकारलेल्या मुलांची ओळख कशी करावी?

सहसा समाजाने नाकारलेली मुले बहुतेक आक्रमक किंवा चिंताग्रस्त असतात. कधीकधी एडीएचडी, ऑटिज्म, सोशल स्ट्रेस और ओसीडी यांसारख्या शारीरिक आणि मानसिक समस्या देखील मुलाच्या वर्तनात बदल घडवून आणू शकतात. याशिवाय त्यांची बोलण्याची भाषा आणि वागणूकही त्यांना समाजापासून वेगळे करते. या कारणांमुळे समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याला सामान्य माणसाप्रमाणे स्वीकारू शकत नाही.

parents - child relationship
Summer Tips: लिंबुपाणी प्या, कुल व्हा! चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही होतील गायब

मुलांना रिजेक्शनपासून कसे वाचवायचे?

पालक म्हणून, आपल्या मुलाला रिजेक्शनपासून वाचवणे, ही आपली जबाबदारी आहे. सर्व प्रथम त्याला रिजेक्शन का मिळतेय हे शोधने आवश्यक आहे. तुमच्या मुलांना एखादी सवय किंवा वागणूक असू शकते ज्यामुळे त्यांना रिजेक्शन मिळत असावे. ती सवय सोडवण्यासाठी मदत करा.

मुलाला रिजेक्शनपासून वाचवण्याचे मार्ग

जर तुमच्या मुलाला भाषा किंवा संस्कृतीच्या अडचणी येत असतील, तर तुम्ही त्याला प्रत्येकजणासोबत बोलणारी सामान्य भाषा शिकवून मदत केली पाहिजे.

तुमच्या मुलांना अंगठा चोखणे, फुशारकी मारणे यांसारख्या सवयी असतील, तर त्यांना या सवयीपासून दुर होण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तो रिजेक्शनपासून योग्य मार्ग काढू शकेल.

parents - child relationship
पुरुषांनीही घ्यावी त्वचेची काळजी; चाळीशीत अनुभवाल पंचवीशीचा 'फिल'

रिजेक्शनला कसे हाताळायचे?

तुमच्या मुलाचे वर्तन, आवडीनिवडी सुधारण्यास मदत करा.त्यांना स्वारस्य असलेल्या विषयांबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करा. या सर्व गोष्टी तुमच्या मुलाला नकारावर मात करण्यास मदत करू शकतात.

parents - child relationship
उन्हाळ्यात त्वचेची काळजी वाटतेय.. जाणून घ्या या खास टिप्स

पालकांनी काय करावे?

जेव्हा तुमचे मुलं चांगले वागतात, तेव्हा त्यांना शाबासकी द्या.आणि ते का आणि कसे चांगले वागले हे त्यांना समजून सांगा.

आपल्या मुलाची स्वारस्य कशात आहे, हे जाणून त्यांना मदत करा. जेव्हा त्यांना रिजेक्शन जाणवते तेव्हा त्यांचे ऐका. मुलांचा आत्मविश्वास वाढवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.